Share

हर्षवर्धन पाटलांना मोठा धक्का; अजितदादांच्या उपस्थितीत चुलत भावाचा राष्ट्रवादीत प्रवेश

Published On: 

पुणे : भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला होता. मात्र त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. राष्ट्रवादीचे उमेदवार, सध्याचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी त्यांचा पराभव केला होता. आता राष्ट्रवादी काँग्रेसने हर्षवर्धन पाटील यांना आणखी एक धक्का दिला आहे.

हर्षवर्धन पाटील यांचे चुलत बंधू व माजी सभापती प्रशांत पाटील यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, जिल्हा अध्यक्ष प्रदीप ग़ारटकर यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला आहे. पुणे येथील शासकीय विश्रामगृह या ठिकाणी हा पक्ष प्रवेश झाला.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशांत पाटील यांचा पक्षप्रवेश हा महत्वाचा मानला जात आहे. प्रशांत पाटील यांच्या प्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला येत्या निवडणुकांमध्ये चांगला फायदा होईल असं बोललं जातंय. राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर प्रशांत पाटील म्हणाले, ‘राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे व राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली इंदापूर तालुक्यात जोरदार काम करणार आहे. भाजपचे असंख्य कार्यकर्ते राष्ट्रवादीत आणणार आहे.’ यामुळे भाजपची डोकेदुखी अधिक वाढण्याची शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!