Share

हरभजन सिंगची सायमंड्सला श्रद्धांजली, दोघांमध्ये ‘मंकीगेट’ प्रकरण गाजलं होतं; वाचा!

Published On: 

मुंबई : ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू अँड्र्यू सायमंड्स (Andrew Symonds)चा कार अपघातात मृत्यू झाला आहे. ४६ वर्षीय सायमंड्सच्या कारचा क्वीन्सलँडच्या टाऊन्सविलेजवळ अपघात झाला. सायमंड्सच्या कारचा अपघात शनिवारी रात्री १०.३० वाजता झाला. सायमंड्स यांच्या मृत्यूनंतर क्रिकेट जगतात शोककळा पसरली आहे. विविध क्रिकेटपटू त्यांच्या निधनावर शोक व्यक्त करत आहेत. भारतीय क्रिकेटपटू एकेकाळचा सायमंड्स यांचा मैदानावरील कट्टर प्रतिस्पर्धी असलेला हरभजन सिंग (Harbhajan Singh) यानेही सायमंड्स यांच्या मृत्यूवर शोक व्यक्त केला.

हरभजन सिंगसोबतचा वाद
सायमंड्स जेवढा धडाकेबाज खेळाडू होता, तेवढाच तो वादातही अडकायचा. त्यांच्या कारकिर्दीत असे अनेक वाद झाले, ज्याची जगभरात आजही चर्चा होते. पबमध्ये भांडणे असो किंवा मैदानावरील भांडणे, सायमंड्सच्या नावावर अनेक वाद झाले. असाच एक वाद झाला, जो ‘मंकीगेट’ नावाने प्रसिद्ध झाला. सायमंड्सचा हा वाद हरभजन सिंगसोबत झाला होता.

‘मंकीगेट’ वाद प्रकरण 

ही गोष्ट २००७-८ ची आहे, जेव्हा भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर होता. ऑस्ट्रेलियाने चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना ३३७ धावांनी जिंकला, तर दुसरा सामना ६ जानेवारी २००८ पासून सिडनी येथे खेळला गेला. या कसोटीत सायमंड्स फलंदाजी करत होता. तेव्हा सायमंड्सचे हरभजनसोबत भांडण झाले होते. नंतर सायमंड्सने आरोप केला की, भज्जीने त्याला ‘माकड’ म्हटले. यानंतर हरभजनवर तीन कसोटी सामन्यांची बंदी घालण्यात आली होती.

सचिन सांगतो की, जेव्हा भज्जी आणि मी फलंदाजी करत होतो तेव्हा प्रकरण तापू लागले होते. हरभजनने ५० धावा पूर्ण केल्याने सायमंड्स चिडला होता. त्याने हरभजन सिंगला डिवचण्यास सुरुवात केली. भज्जीने अनेकवेळा येऊन मला सांगितले की, , सायमंड्स त्याला चिथावणी देण्याचा प्रयत्न करत आहे. सचिन त्याला सतत शांत राहण्यास सांगत होता. यावेळी भज्जीने मस्करीत ब्रेट लीच्या पाठीवर थाप मारली, त्यावर फिल्डिंग करत असलेला सायमंड्स चिडला आण त्याचा हरभजनसोबत वाद झाला. सायमंड्सने शिवीगाळ सुरू भज्जीही चिडला आणि वाद विकोपाला गेला.

सायमंड्सची कारकीर्द

सायमंड्सने ऑस्ट्रेलियासाठी २६ कसोटी, १९८ एकदिवसीय आणि १४ टी-20 सामने खेळले. यादरम्यान त्याच्या बॅटने कसोटी १४६२ धावा, एकदिवसीय ५०८८ धावा आणि टी-२० ३३७ धावा केल्या. आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याने तिन्ही फॉरमॅटमध्ये एकूण १६५ विकेट घेतल्या आहेत. सायमंड्स त्याच्या आक्रमक आणि मैदानावरील उत्कृष्ट क्षेत्ररक्षणासाठीही ओळखला जात असे. सायमंड्सने आयपीएलमध्ये डेक्कन चार्जर्स आणि मुंबई इन्डियन्ससाठी ३९ सामन्यात ९७४ धावा केल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या:

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!