Share

अजून एक जेतेपद..! पी. व्ही. सिंधूनं जिंकली स्विस ओपन स्पर्धा

Published On: 

मुंबई : भारताची अव्वल महिला बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने रविवारी स्विस ओपन सुपर ३०० स्पर्धेच्या अंतिम फेरीत थायलंडच्या बुसानन ओंगबामरांगफानचा पराभव करून या हंगामातील तिचे दुसरे महिला एकेरीचे विजेतेपद पटकावले. दोन वेळा ऑलिम्पिक पदक विजेती सिंधूने चौथ्या मानांकित थायलंडच्या खेळाडूला ४९ मिनिटांच्या लढतीत २१-१६, २१-८ अशी मात दिली.

सिंधूचा बुसाननविरुद्धच्या १७ सामन्यांतील हा १६वा विजय आहे. २०१९च्या हाँगकाँग ओपनमध्ये ती बुसाननकडू फक्त एकदाच हरली आहे. सिंधूला रिओ ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या स्पेनच्या कॅरोलिना मारिनकडून गेल्या मोसमाच्या अंतिम फेरीत पराभव पत्करावा लागला होता.

सिंधूने या वर्षी जानेवारीमध्ये लखनऊमध्ये सय्यद मोदी इंटरनॅशनल सुपर ३०० जिंकली. सिंधूने या सामन्यात आक्रमक सुरुवात करत ३-० अशी आघाडी घेतली. बुसाननने मात्र पुनरागमन करत गुणसंख्या ७-७ अशी बरोबरी साधली. बुसानन सिंधूला नेटपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करत होती पण तिचे फटके पूर्ण करू शकली नाही. ब्रेकच्या वेळी सिंधूकडे दोन गुणांची आघाडी होती.
बॅकलाइनजवळ एका शानदार शॉटमुळे सिंधूला चार गेम पॉइंट मिळाले. दुसऱ्या गेममध्ये बुसाननला सिंधूशी टक्कर देण्यात अपयश आले. सिंधूने ५-० अशी आघाडी घेत हा सेटही सहज जिंकला.

महत्त्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!