मुंबई : गुजरात टायटन्स इंडियन प्रीमियर लीगमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज आहे. लखनऊ सुपर जायंट्सही पदार्पण करणार आहे. गुजरात आणि लखनऊ यांचा पहिला सामना २८ मार्च रोजी होणार आहे. पहिल्या सामन्यापूर्वी गुजरात टायटन्सने राशिद खानला मोठी जबाबदारी दिली. राशिदला उपकर्णधार बनवण्यात आले आहे.
राशिद खानसाठी नेतृत्व नवीन नाही. त्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक सामन्यांमध्ये अफगाणिस्तानचे नेतृत्व केले आहे. आयपीएल २०२२च्या मेगा लिलावापूर्वी गुजरात टायटन्सने राशिदला १५ कोटींमध्ये संघात दाखल केले. गुजरात टायटन्सने त्यांच्या इंस्टाग्राम हँडलवर राशिद खानची उपकर्णधारपदी नियुक्ती जाहीर केली आहे. फ्रेंचायझीने हार्दिक पंड्या आणि रशीद खानचा हसणारा फोटो शेअर केला आणि कॅप्शन लिहिले, ‘रशीद खान आणखी एका नवीन हंगामात आमचा उपकर्णधार असेल.’
राशिद खान म्हणाला, की हार्दिक पंड्यासोबत आणि नवीन फ्रेंचायझीसाठी खेळण्यावर आपले लक्ष आहे. दोघांनी यापूर्वी कधीही एकत्र सामने खेळलेले नाहीत. दोघांनी आयपीएलमध्ये विविध फ्रेंचायझींचे प्रतिनिधित्व केले होते. गुजरात टायटन्सच्या कर्णधारामध्ये खूप सकारात्मक ऊर्जा आहे, असे राशिदने म्हटले.
महत्त्वाच्या बातम्या –
- सुप्रिया सुळेंना सलग सातव्यांदा संसदरत्न; राष्ट्रवादीच्या ट्वीट करत शुभेच्छा
- गोव्याच्या १४ व्या मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ!
- IPL 2022 : आज नव्या संघांमध्ये पहिली लढत; वाचा काय सांगते वानखेडेची खेळपट्टी!
- “…हे तुम्हाला दिसत नाही का?”, सुप्रिया सुळेंच्या ‘त्या’ वक्तव्यावरून भाजपचा सवाल
- सिंधुदुर्ग आणि संपूर्ण कोकण शिवसेनेचा बालेकिल्ला- संजय राऊत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

