Share

सुप्रिया सुळेंना सलग सातव्यांदा संसदरत्न; राष्ट्रवादीच्या ट्वीट करत शुभेच्छा

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांना नुकतेच संसदरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सुप्रियाताईंनी सलग सातव्यांदा संसदरत्न होण्याचा सन्मान प्राप्त केला आहे. असे ट्वीट NCP च्या अधिकृत ट्वीटरवर करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर सर्वत्र सुप्रिया सुळे (NCP MP Supriya Sule) यांचे कौतुक तसेच अभिनंदन करण्यात येत आहे.

“१७ व्या लोकसभेतील सुप्रियाताईंच्या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत चेन्नई येथील प्राईम पॉईंट फाउंडेशनतर्फे या पुरस्कारासाठी सुप्रियाताईंची निवड करण्यात आली. लोकसभेत लोकांचे प्रश्न मांडण्यात सुप्रियाताई नेहमीच आघाडीवर असतात. १७ व्या लोकसभेतही दमदार कामगिरी करत सुप्रियाताईंनी ९२ टक्के उपस्थिती आणि ६३ चर्चासत्रात सहभाग नोंदविला आहे. तसेच ४०२ प्रश्न उपस्थित करून ८ खासगी विधेयके मांडली आहेत.”, अशी माहिती राष्ट्रवादीने ट्वीटद्वारा दिली आहे.

दरम्यान सुप्रिया सुळे नेहमीच कणखर वक्तव्यांसाठी ओळखल्या जातात. लोकसभेत त्यांनी अनेक मुद्द्यांवरून केंद्र सरकारला निशाण्यावर धरले आहे. त्यांना संसदरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्यानंतर राजकीय क्षेत्रातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!