Share

कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी वर्षाचा शेवट गोड! केंद्र सरकारने घेतला महत्वाचा निर्णय

Published On: 

नवी दिल्ली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन केल्याने शेतमालाला कवडीमोल भाव मिळत होता. सप्टेंबरमध्ये शेतमालाला योग्य भाव मिळायला लागले असताना केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेऊन शेतकऱ्यांना अडचणीत आणण्याचे काम केले होते.

यानंतर, राज्यातील शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. सप्टेंबरमध्ये कांद्याला प्रतिकिलो ४० रुपयांचा भाव मिळताच, केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी करण्याचा निर्णय घेतला होता. केंद्र सरकारने घेतलेल्या या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी देखील सुरू झाली होती. यामुळे शेतकरी प्रचंड आक्रमक होऊन रस्त्यावर देखील उतरले होते. तर, विरोधी पक्षांनी देखील या निर्णयाचा निषेध केला होता.

सद्या, दिल्लीच्या सीमेवर नव्या कृषी कायद्यांविरोधात शेतकरी आक्रमक झाले असतानाच कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने महत्वाचा निर्णय घेतला आहे. १ जानेवारीपासून कांद्यावरील निर्यातबंदी उठवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्यामुळे, शेतकऱ्यांचा २०२० चा शेवट या गोड बातमीने होणार आहे. शेतकऱ्यांच्या डोळ्यात कांद्यानं आणलेलं पाणी तब्बल ३ महिन्यानंतर केंद्राला दिसलं आणि भाव नियंत्रणासाठी घातलेली निर्यातबंदी मागे घेण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!