🕒 1 min read
अहमदनगर:- राज्यातील मुदत संपणार्या आणि लांबणीवर पडलेल्या 14 हजार 234 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा बिगुल वाजला आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून 15 जानेवारीला मतदान होत आहे. परंतु, आता सरपंचपदाचे आरक्षण मतदानानंतर काढण्याचा आदेश ग्रामविकास विभागाने सर्व जिल्हाधिकार्यांना दिले आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यात अनेक ग्रामपंचायतीच्या निवडणुका १५ जानेवारीला होत असून माजी मंत्री राम शिंदे यांच्या विरुध्द त्यांचे पुतणे अक्षय शिंदे यांनी दंड थोपटल्यामुळे यावेळी चौंडी ता.जामखेड ग्रामपंचायत निवडणुकीत राम शिंदे यांचा राजकीय कस लागणार आहे.
माजी मंत्री राम शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पॅनलला त्यांचेच पुतणे अहिल्यादेवीचे वंशज अक्षय शिंदे यांनी समविचारी कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन आव्हान दिले आहे. त्यामुळे यावेळी चौंडीची निवडणूक बिनविरोध होणार नाही, अशी स्थिती आहे. याच ग्रामपंचायतीच्या सरपंचपदापासून राम शिंदे यांच्या राजकीय प्रवासाची सुरुवात झाली होती. त्यामुळे येथील ग्रामपंचायतीला अनन्यसाधारण महत्व आहे. मागील वेळी माजी मंत्री शिंदे यांनी येथील निवडणूक बिनविरोध केली होती. यावेळी मात्र निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापलेले आहे. त्यामुळे बिनविरोध निवडणुकीची चिन्हे दिसत नाहीत.
महत्वाच्या बातम्या
- ‘ईडीने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्या, उगाच कांगावा कशाला करताय?’
- ‘धनुष्यबाण ते हवाबाण! नेहमीप्रमाणेच तोंडाची वाफ अन् नुसत्या हवेत पोकळ गप्पा!’
- ‘लालपरी’सह एसटीचा प्रवास होणार अधिक वेगवान!
- नव्या कृषी कायद्यांचा विरोध करण्यासाठी पंजाबमध्ये शेतकऱ्यांनी तोडले जिओचे टॉवर
- राजकीय दुकानदारी बंद होण्याच्या भीतीमुळे मुख्यमंत्र्यांचा कृषी कायद्यांना विरोध- फडणवीस
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
