Share

३१ डिसेंबरच्या पार्टीसाठी महाबळेश्वरला जाण्याआधी विचार करा; जिल्हाधिकाऱ्यांनी दिले ‘हे’ आदेश

Published On: 

🕒 1 min read

सातारा : ब्रिटन मध्ये नवा कोरोना विषाणू आल्याचे कळताच जगभरात पुन्हा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ब्रिटनमध्ये कोरोनाचा दुसरा विषाणू आढळल्यानंतर खबरदारी म्हणून राज्य शासनाने नाईट कर्फ्यु करण्याचा निर्णय घेतला. महापालिका क्षेत्रांमध्ये5 जानेवारीपर्यंत रात्री कडक संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

यानंतर, नाताळ व विकेंड अशा सलग सुट्ट्या आल्याने नागरिकांनी शहरातून बाहेर गावी जाण्याचा पर्याय निवडला. रात्री फिण्यास शहरात मनाई असल्याने पुणे-मुंबईच्या लोकांनी महाबळेश्वर सारखं ‘डेस्टिनेशन’ ठरवून सेलिब्रेशन केल्याचं या काळात दिसून आलं. तर, अनेकांनी देवदर्शनाचा पर्याय अवलंबला. यामुळे वेळीच खबरदारी म्हणून अनेक देवालये पुन्हा बंद करण्याचा निर्णय देवस्थान समित्यांनी घेतला.

राज्यातील थंड हवेच प्रसिद्ध गिरिस्थान महाबळेश्वर सद्या पर्यटकांमुळे चांगलंच गजबजलं आहे. नागरिक कोरोनाच्या भयाला विसरले असले तरी संकट पूर्ण निवळलेलं नाही. त्यामुळेच साताऱ्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी नियमावली जाहीर केली आहे. त्यानुसार, ३१ डिसेंबर रोजी पाचगणीसह महाबळेश्वरमध्ये देखील रात्री जमावबंदी करण्यात आली आहे. यासोबतच ३१ डिसेंबरच्या रात्री १० नंतर सर्व प्रकारच्या कार्यक्रमांना बंदी घालण्यात आली आहे.

यामुळे, नववर्षाचं स्वागत जल्लोषात करायचं नियोजन केलेल्यांचा चांगलाच हिरमोड झाला आहे. यंदाच्या नववर्षाचं घरातूनचस्वागत करावं असं आवाहन प्रशासनातर्फे करण्यात येत आहे. आपलं शहर सोडून महाबळेश्वर सारख्या ठिकाणी ‘सेलिब्रेशन’ची तयारी व कार्यक्रमांसाठी बुकिंग केलेल्यांना आवर घालण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!