मुंबई : गेले कित्येक दशके महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात प्रवास करण्यासाठी नागरिक हे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या सेवेला म्हणजेच ‘एसटी’ला पसंती देतात. दळणवळणाचं प्रमुख साधन बनलेल्या ‘लालपरी’चा प्रवास अधिक वेगवान होणार आहे. एसटीने प्रवाशांचा वेळ वाचवण्यासाठी आता पावले उचलले आहेत.
कुठल्याही हॉटेलच्या थांब्यावर बस १५ मिनिटांहून अधिक वेळ थांबल्यास संबंधित बस चालक-वाहकावर होणार कारवाई होणार आहे. एसटीच्या सर्व विभाग नियंत्रकांकडे यासंबंधीचे आदेश देण्यात आले आहेत. याआधी देखील राज्य परिवहन महामंडळाने बस कोणत्या हॉटेलवर थांबेल याचे नियोजन केले होते.
दिलेल्या थांब्यांव्यतिरिक्त जर बस थांबवली तर कारवाई होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. जास्त वेळ एसटी एका थांब्यावर थांबणार नसल्याने प्रवाशांच्या वेळेची बचत होण्यास मदत होणार आहे. कारण कुठल्याही हॉटेलच्या थांब्यावर बस १५ मिनिटांहून अधिक वेळ थांबवता येणार नाही. जर असा प्रकार उघड झाला तर बस चालक-वाहकाची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत.
महत्वाच्या बातम्या
- ‘ईडीने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्या, उगाच कांगावा कशाला करताय?’
- ‘धनुष्यबाण ते हवाबाण! नेहमीप्रमाणेच तोंडाची वाफ अन् नुसत्या हवेत पोकळ गप्पा!’
- दिवाकर रावतेंमुळे एसटी महामंडळ तोट्यात : इंटक
- देशातील पहिल्या ‘चालकरहीत’ मेट्रोचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार उद्घाटन
- राजकीय दुकानदारी बंद होण्याच्या भीतीमुळे मुख्यमंत्र्यांचा कृषी कायद्यांना विरोध- फडणवीस
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

