मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीला अद्याप सव्वा वर्षाचा अवधी आहे. मात्र मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचे नियोजन भाजपाने सुरू केल्याचे वृत्त आल्यापासून या निवडणुकीचा विषय राजकीय वर्तुळात ऐरणीवर आला आहे. आता, भाजप पाठोपाठ काँग्रेसने देखील आपली रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे.
राज्यात काँग्रेस-शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस ता तीन पक्षांनी स्थापन केलेल्या महाविकास आघाडीची सत्ता आहे. नुकत्याच पार पडलेल्या पदवीधर व शिक्षक आमदार निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला चांगलं यश मिळवता आलं. त्यामुळे एकीच्या बळाचा अनुभव आल्यानंतर महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांनी पुढील येणाऱ्या निवडणुका देखील एकत्रपणे लढवल्या जातील असा खुलासा केला होता. मात्र, आता स्थानिक पातळीवर होणाऱ्या मागणीमुळे महाविकास आघाडीत तणाव वाढण्याची चिन्हे आहेत.
अशातच, सामनासह शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी युपीए व काँग्रेसची सद्याची अवस्था यावर केलेलं भाष्य काँग्रेसच्या चांगलंच जिव्हारी लागल्याचं दिसून येत आहे. काँग्रेसच्या नेत्यांनी महापालिका निवडणुकांमध्ये स्वबळाची नारा दिला असतानाच आता काँग्रेस नेते व मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी केलेल्या विधानामुळे तणाव आणखी वाढू शकतो.
‘आगामी काळात काँग्रेसच्या मदतीशिवाय मुंबईचा महापौर बसू शकत नाही.’ असं विधान त्यांनी केल्यामुळे सद्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. पुढे ते म्हणाले, ‘येत्या काळात जिल्हानिहाय वॉर्ड ऑफिस कार्यकर्त्यांच्या मागे उभे राहिले पाहिजे. मुंबईत काँग्रेसचा विस्तार झाला पाहिजे. अन्यथा मला पाच वर्षे मंत्रिपदावर राहण्याचा हक्क नाही.’
महत्वाच्या बातम्या
- ३१ डिसेंबरच्या पार्टीसाठी महाबळेश्वरला जाण्याआधी विचार करा; जिल्हाधिकाऱ्यांनी दिले ‘हे’ आदेश
- ‘कंगनाच थोबाड फोडू हे सांगताना शिवसेनेला मर्दानगी आठवली नाही का?’
- ‘लालपरी’सह एसटीचा प्रवास होणार अधिक वेगवान!
- ग्रामपंचायत निवडणूक: राम शिंदेच्या चाैंडी गावात पुतण्यानेच थोपटले काकांच्या विरोधात दंड
- ‘मार्च’नंतर हे सरकार दिसणार नाही; राणेंनी सांगितला महाआघाडी सरकार कोसळण्याचा नवा मुहूर्त!


