सिंधुदुर्ग : २०१९ विधानसभांच्या निकालानंतर शिवसेनेने भाजपसोबत असलेला संसार मोडून विसंगत विचारधारा असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत महाविकास आघाडीचं सरकार स्थापन केलं. यानंतर, हे तीनचाकी सरकार एकमेकांच्या पायात पाय अडकून पडेल असं भाकीत करून भाजप नेत्यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली.
या सरकारने वर्षपूर्ती केली आहे. तसेच, हे सरकार पुढील ५ वर्षे देखील टिकेल असं प्रत्युत्तर भाजप नेत्यांना देण्यात येत आहे. दरम्यान, सद्या राज्यात ईडीमुळे वातावरण चांगलंच तापलेलं असताना आता शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) समन्स बजावलं आहे. पीएमसी बँकेच्या घोटाळ्याप्रकरणी त्यांना २९ डिसेंबरला चौकशीसाठी पाचारण करण्यात आले असल्याचं वृत्त माध्यमांनी दिले आहे.
यासंदर्भात, संजय राऊत यांनी भाजपसह ईडी व इतर तपास यंत्रणांवर ताशेरे ओढले आहेत. त्यांच्या या टीकांना भाजपचे खासदार नारायण राणे यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे. यावेळी त्यांनी हे सरकार मार्चनंतर दिसणार नाही असं भाकीत देखील वर्तवलं आहे. हे टेम्परवरी (तात्पुरतं) आहेत. लवकरात लवकर ते मोठ्या रजेवर जाणार आहेत. तर, मार्चनंतर हे सरकार दिसणार नाही. आम्ही केंद्रातही आहोत आणि राज्यातही येणार,’ असं ते म्हणाले आहेत.
संजय राऊतांवर राणेंचा ‘प्रहार’
‘भाजप ईडीचा वापर करत नाही. केंद्र सरकार अंतर्गत ईडी आणि सीबीआय आहे. ईडी आणि सीबीआय पुरावे असल्याशिवाय कोणाची चौकशी करत नाही. राऊतांनी पीएमसी बँकेत गैरव्यवहार केले. एक कोटीला घेतलेली मालमत्ता आता किती कोटीची आहे? आज त्याची किंमत अकरा ते बारा कोटी आहे. मग ती मालमत्ता एक कोटीला कशी काय मिळाली? आणि मग एक कोटीला कर्ज दाखवायचं, म्हणून ईडीला तक्रार गेली. त्या बँकेची चौकशी सुरू असताना हे पुरावे मिळाले, म्हणून ईडीने ही नोटीस दिली. असंच कोणाला ईडी वैगेरे नोटीस देत नाही.’ असं राणे म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- ३१ डिसेंबरच्या पार्टीसाठी महाबळेश्वरला जाण्याआधी विचार करा; जिल्हाधिकाऱ्यांनी दिले ‘हे’ आदेश
- ‘कंगनाच थोबाड फोडू हे सांगताना शिवसेनेला मर्दानगी आठवली नाही का?’
- ‘लालपरी’सह एसटीचा प्रवास होणार अधिक वेगवान!
- ग्रामपंचायत निवडणूक: राम शिंदेच्या चाैंडी गावात पुतण्यानेच थोपटले काकांच्या विरोधात दंड
- ‘राऊत फक्त बडबड करतात, तर ईडी पुरावे असल्याशिवाय चौकशी करत नाही’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

