Share

पुण्यातील बालेवाडीतून अपहरण झालेला स्वर्णव सापडला

Published On: 

पुणे: पुण्यातील बालेवाडीतून अपहरण झालेला स्वर्णव चव्हाण हा चार वर्षीय मुलगा अखेऱ आज दुपारी साधारण अडीच वाजेच्या सुमारास सापडला. पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (Amitabh Gupta) यांनी देखील याबाबत माहिती दिली आहे. पुण्यातील डॉ. सतीश चव्हाण (Dr. Satish Chavan) यांच्या स्वर्णव (डुग्गु) या चार वर्षीय मुलाचं बालेवाडीमधून आठवडाभरापूर्वी अपहरण झालं होतं.

स्वर्णवचे वडील सतीश चव्हाण यांनी सोशल मीडियावरून अपहरणकर्त्यांना वारंवार आवाहन केलं होतं. तुम्ही पाहिजे तेवढे पैसे घ्या पण माझ्या लेकराला सोडा, अशी आर्त विनवणी ते करत होते. तसेच, त्याला ताप आला असल्यास कुठलं औषध द्यायचं हे देखील त्यांनी सोशल मीडियाद्वारे सांगितलं होतं. या सर्व प्रकारामुळे नेटकऱ्यांमध्ये देखील चिंता पसरली होती. स्वर्णवचा जवळपास ३०० पेक्षा अधिक पोलीस कर्मचारी आणि अधिकरी सर्वत्र शोध घेत होते. अखेर आज दुपारच्या सुमारास वाकड जवळील पुनावळे येथे स्वर्णव सापडला. मात्र त्याचं अपहरण कोणी आणि का केलं, याबाबत अद्याप माहिती मिळू शकलेली नाही.

पुनावळ्यातील लोटस पब्लिक स्कूलच्या जवळ एक इमारत आहे. तिथे स्वर्णवला अज्ञात व्यक्तीने सोडले आणि त्याच्या बॅगेत एक चिठ्ठी ठेवली होती. त्याच्या वडिलांचा नंबर होता. दरम्यान, तेथील सुरक्षा रक्षक दादाराव जाधव याने बॅगेत असलेल्या चिठ्ठीवरील नंबरवर व्हिडिओ कॉल करून मुलगा त्यांचा आहे का ही खात्री करून घेतली. त्यानंतर मुलाचे कुटुंबीय त्या ठिकाणी आले. अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर (Dr. Vivek Muglikar) यांनी दिली आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!