Share

१९ वर्षानंतर ह्रतिक आणि सैफ पुन्हा एकत्र! दाक्षिणात्य ‘विक्रम वेधा’च्या रिमेकमध्ये झळकणार

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : बॉलीवुडचा सुपरस्टार ह्रतिक रोशन आणि बॉलीवूडचा नवाब सैफ अली खान तब्बल १९ वर्षानंतर पुन्हा एकत्र येत आहे. दक्षिण भारतात तमिळ भाषेत आलेल्या ‘विक्रम वेधा’च्या रिमेकमध्ये हे दोघे काम करणार आहे. यापुर्वी ह्रतिक साकारत असलेले पात्र अमिर खान साकारणार अशी चर्चा सुरु होती.

तमिळमध्ये आलेला ‘विक्रम वेधा’ हा चित्रपट तुफान चालला होता. तमिळमध्ये आलेल्या या चित्रपटात आर माधवन आणि विजय सेथुपती यांच्या प्रमुख भूमिका होत्या. अनेक दिवसापासुन या चित्रपटाचा हिंदीत रिमेक येणार अशी चर्चा सुरु होती. या रिमेकमध्ये प्रमुख भूमिकेत सैफअली खान आणि अमिर खान दिसणार अशी चर्चा सुरु होती. मात्र अमिरने नकार दिल्यानंतर ही भूमिका ह्रतिकच्या वाटेला आली.

‘विक्रम वेधा’च्या हिंदी रिमेकचे दिग्दर्शन मुळ चित्रपटाचे दिग्दर्शक पुष्कर गायत्री हीच जोडी करणार आहे. हा चित्रपट पुढील वर्षी ३० सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. यादरम्यान ह्रतिक फायटर आणि क्रिश ४ ची तयारी करत आहे. तर सैफअली खान ओम राऊत यांच्या अदिपुरुषमध्ये रावणाची भूमिका साकारत आहे. ह्रतिक आणि सैफ यांनी यापुर्वी २००२ मध्ये आलेल्या ‘ना तुम जानो ना हम’ या चित्रपटात एकत्र काम केले होते.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!