Share

काँग्रेसमध्ये अंतर्गत गटबाजी उफाळली; नितीन राऊतांची पटोलेंविरुद्ध सोनियांकडे तक्रार

Published On: 

मुंबई : काँग्रेस अंतर्गत गटबाजी पुन्हा उफाळून आली असून राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी आज काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेऊन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या कार्यपद्धतीबाबत तक्रार केल्याची माहिती सूत्रांनी दिली. ऊर्जा खाते सोडून विधानसभेचे अध्यक्षपद स्वीकारावे म्हणून आपल्याविरोधात पक्षांतर्गत कारवाया केल्या जात असल्याचे राऊत यांनी सोनियांना सांगितल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

राऊत यांनी दिल्लीतील १० जनपथ येथे गुरुवारी सोनिया गांधी यांची भेट घेतली. प्रदेशाध्यक्ष पटोले यांनी खनिकर्म विभागातील भ्रष्टाचारासंदर्भात मुख्यमंत्र्यांकडे मध्यंतरी पत्र पाठवून तक्रार केली होती. खनिकर्म मंडळाकडून ऊर्जा विभागाची महाजनको कंपनी कोळसा खरेदी करते. पटोले यांच्या तक्रारीचा रोख ऊर्जा विभागाला बदनाम करणे असा होता, असा पाढा राऊत यांनी वाचल्याचे समजते. कोरोनाच्या काळात सोनिया गांधी पदाधिकाऱ्यांना सहसा भेटत नाहीत.

पण राऊत यांना भेटून सोनियांनी २० मिनिटे चर्चा केल्याने पक्षातील सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. राऊत शुक्रवारी दिल्लीत असताना पक्षाचे ज्येष्ठ नेते व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात दिल्लीतच होते. याविषयी थोरात यांना विचारले असता प्रदेश काँग्रेसमध्ये कोणतेही वाद नाहीत. राऊत पक्षाच्या अनुसूचित जाती सेलचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. त्यासंदर्भात ते भेटले असावेत, अशी सारवासारव थोरात यांनी केली.

नाना पटोले प्रदेशाध्यक्ष आहेत. विधानसभा अध्यक्षपद सोडताना पटोले यांना राहुल गांधी यांनी मंत्रिपदाचे वचन दिले होते. विधानसभेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला तेव्हापासूनच ते ऊर्जामंत्री होणार, अशी चर्चा जोरात सुरू आहे. नागपूर लोकसभेची निवडणूक लढल्याने त्यांना नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्रीसुद्धा व्हायचे असल्याचे बोलले जाते. त्यामुळे पटोले आणि राऊत यांच्यात मतभेद निर्माण झाले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!