Share

स्वप्निल लोणकर आत्महत्या प्रकरण: ठाकरे सरकारच्या विरोधात अभाविपचे पुण्यात तीव्र आंदोलन

Published On: 

पुणे : विद्येचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या व स्पर्धा परीक्षेच्या तयारीचे केंद्र असलेले शहर काल स्वप्नील लोणकर या स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवाराच्या आत्महत्येने हादरले आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या ( एमपीएससी ) वतीने घेतल्या जाणाऱ्या परीक्षेत उत्तीर्ण होऊनही त्याची मुलाखत न घेतल्याने व या अनुषंगाने नोकरी मिळत नसल्याने स्वप्नीलने वयाच्या २४ व्या वर्षी गळफास लावून आत्महत्या केली. एमपीएससीच्या पूर्व आणि मुख्य परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतरही २ वर्षे मुलाखत झालीच नाही आणि स्वप्नील हळूहळू नैराश्यात गेला. या काळात घरची परिस्थिती आणि परीक्षेनंतर नोकरी लागेल या आशेवर घेतलेले कर्ज यासारख्या कारणांमुळेही स्वप्नीलवरील तणाव वाढत गेला. त्याच्या संयमाचा अंत झाला आणि त्याने हे टोकाचे पाऊल उचलले.

याच पार्श्वभूमीवर आज पुण्यामध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषेदेने जिल्हाधिकारी कार्यालय येथे आंदोलन केले होते. ‘स्वप्नील लोणकरच्या मृत्यूला राज्य शासनच पूर्णतः जबाबदार आहे. राज्य शासनाच्या नाकर्तेपणाने उच्चशिक्षित स्वप्नील लोणकरचा बळी घेतला आहे, अशी वेळ पुन्हा कोणत्याही विद्यार्थ्यावर न यावी म्हणून अभाविप रस्त्यावर उतरली आहे.MPSC च्या प्रलंबीत परीक्षा, ऊत्तीर्ण विद्यार्थ्यांना नोकरीवर रुजू करण्याची प्रक्रिया राज्य सरकारने तात्काळ पूर्ण करावी अन्यथा या पेक्षा ही तीव्र आंदोलन पुणे शहरातील विविध चौकात करण्यात येईल.’ असे या वेळी अभाविप पुणे महानगर मंत्री शुभम भुतकर यांनी सांगितले.

तसेच अभाविपच्या वतीने पुणे जिल्हाधिकारी कार्यालय येथे एमपीएससी विद्यार्थी स्वप्निल लोणकर यास श्रद्धांजली अर्पित करण्यात आली, यावेळी महाराष्ट्र प्रदेश सहमंत्री अनिल ठोंबरे, पुणे महानगर मंत्री शुभम भुतकर यांसह अनेक एमपीएससी विद्यार्थी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!