Share

धनंजय मुंडेंकडून ऊसतोड मजुरांना दिलासा, गोपीनाथ मुंडे ऊसतोड कल्याण महामंडळासाठी २० कोटींची तरतूद

Published On: 

मुंबई : लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळ अनेक वर्षे फक्त कागदावर आणि घोषणेपूरतं मर्यादित राहिले होते. पण या महामंडळाला सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी आपल्या खात्याकडे वर्ग करून घेतल्यानंतर खऱ्या अर्थाने मूर्त स्वरूप प्राप्त झाले आहे.

आज पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळास पहिल्यांदाच २० कोटी रुपये इतकी आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. पावसाळी अधिवेशनातील पुरवणी मागण्यांदरम्यान ही तरतूद करण्यात आलीय. मार्च महिन्यात अर्थसंकल्पीय अधिवेशनात हा निधी उपलब्ध करून देण्याबाबतची घोषणा झाली होती.

या निधीबाबत धनंजय मुंडे यांनी ट्विटद्वारे माहिती दिली आहे. ते म्हणाले की,’ लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळास भागभांडवल अंशदान म्हणून १० कोटी व सहाय्यक अनुदान म्हणून १० कोटी असे एकूण २० कोटी रुपये पावसाळी अधिवेशनाच्या पुरवणी मागण्यांमध्ये मंजूर करण्यात आले आहेत. महामंडळाच्या माध्यमातून करावयाच्या विकास कार्याची ही सुरुवात आहे.

आज पहिल्यांदाच महामंडळाला २० कोटी रुपये आर्थिक तरतूद केल्याबद्दल राज्य सरकारचे आभार मानतो, अशा शब्दात सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह महाविकास आघाडी सरकारचे आभार मानले आहेत.

दरम्यान गेल्या अनेक वर्षांपासून ऊसतोड कामगारांचे कल्याणकारी महामंडळ आणि त्यांच्या नावाने विविध योजनांची केवळ घोषणा केली जात होती. मात्र त्यांच्या भावनांचा केवळ राजकीय वापर होत होता. पण धनंजय मुंडे यांनी मात्र ऊसतोड कामगार कल्याण महामंडळास मूर्त स्वरूप प्राप्त करून दिले आहे. संत भगवानबाबा शासकीय वसतिगृह योजना अत्यंत कमी कालावधीत अस्तित्वात आणल्याने ऊसतोड कामगार, वाहतूकदार यांच्या विविध संघटनांकडून धनंजय मुंडे यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!