मुंबई : ओबीसींचा इम्पेरीकल डेटा केंद्र सरकारने देण्यासाठी आज विधानसभेत ठराव मांडण्यात आला. राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी हा ठराव मांडला. पण विरोधकांच्या गदारोळातच हा ठराव मंजूर करण्यात आला. या मुद्द्यावरुन विरोधकांनी सभागृहात चांगलाच गोधळ घातला. यावेळी विधानसभा अध्यक्षांनी आमदारांना इशारा देत ठराव संमत झाल्याची घोषणा केली.
अनेक प्रयत्न करूनही ओबीसींचा डेटा मिळाला नाही. त्यामुळे हा ठराव मांडत असल्याचं भुजबळ यांनी सांगितलं. ओबीसी आरक्षणाबाबत केंद्र सरकारविरोधात ठराव आवाजी मतदानानं मंजूर करण्यात आला आहे. परंतु, विधानसभेचं कामकाज १० मिनिटांसाठी तहकूब करण्यात आलं आहे. ओबीसी आरक्षणाचा ठराव मतांसाठी मांडताना भाजप आमदार आक्रमक झाले. भाजप आमदारांनी वेलमध्ये उतरुन विधानसभाध्यक्षांच्या माईकला हात लावला.
तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी हा ठराव मंजुरीसाठी टाकला. यावेळी विरोधकांनी हौदात येऊन प्रचंड गदारोळ केला. या गदारोळातच तालिका अध्यक्षांनी ठराव मंजूर केला. त्यानंतर दहा मिनिटांसाठी विधानसभेचं कामकाज तहकूब करण्यात आले.
महत्वाच्या बातम्या
- ‘पळून जायला मी काय मोदी आहे का?’, शिवसेना आ.प्रताप सरनाईकांनी आरोप फेटाळले
- ‘अनिल देशमुख देखील असेच मधात बोलत होते, आता ते आत जाताहेत’, मुनगंटीवारांचे सभागृहात वादग्रस्त वक्तव्य
- मोठी बातमी! ‘एमपीएससीची सर्व रिक्त पदे ३१ जुलैपर्यंत भरणार’, अजित पवारांची घोषणा
- स्वप्निल लोणकरच्या कुटुंबीयांना ५० लाख रुपये द्या; सुधीर मुनगंटीवार यांची विधिमंडळात मागणी
- हकालपट्टीनंतर दोन आठवड्यात अझरुद्दीनने केले पुनरागमन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
