जालना: ‘शेतकऱ्यांना विम्याचे संरक्षण द्यावे’ या मागणीसह जालन्यात स्वाभिमानी शेतकरी संघटना चांगलीच आक्रमक झाली असल्याचे बघायला मिळत आहे. मारठवड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये संघटनेने आंदोलन तसेच रास्ता रोको देखील केले. येथील जिल्हा कृषी विभाग कार्यालयासमोर शुक्रवारी दीड तास स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ‘ठिय्या आंदोलन’ केले. शेतकऱ्यांना मृग बहारातील विम्याचे संरक्षण द्यावे अन् तत्काळ मदत रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर देण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
शुक्रवारी सकाळी अकरा वाजता जालन्यातील अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयासमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आवाहनाला प्रतिसाद देत शेतकरी मोठ्या प्रमाणात दाखल झाले. शेतकरी तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी या वेळी फळ पीक विमा मिळावा याबाबत घोषणाबाजी करून कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे विमा मिळत नसल्याच्या घोषणा केल्या. शेतकऱ्यांच्या पाठीमागे उभे न राहता विमा कंपन्यांची बाजू मांडणाऱ्या अधिकाऱ्यांचा निषेध या वेळी शेतकऱ्यांनी केला.
दरम्यान, आंदोलनाला कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी भेट दिल्यानंतर या वेळी शेतकऱ्यांना कृषी विभागाकडून तांत्रिक बाबी पटवून देण्यात आल्या. मात्र, खरीप हंगाम २०२० मध्ये नैसर्गीक आपत्तीच्या पंचनाम्यानुसार मृग बहार २०२० चा फळ पीक विमा मंजूर करावा या मागणीवर शेतकऱ्यांनी जोर देत शुक्रवारचे आंदोलन केले. या वेळी विमा हा शेतकऱ्यांच्या हक्काचा असून तो मान्यच करावा अशी मागणी करण्यात आली.
महत्वाच्या बातम्या
- पासपोर्ट नूतनीकरणप्रकरणी उच्च न्यायालयाचा कंगनाला दिलासा देण्यास नकार
- प्रशिक्षकपद स्विकारल्यावर राहून द्रविड काय करणार ; सचिनने केला खुलासा…
- इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी भारतीय खेळाडू तीन आठवडे सुट्टीवर ; माजी कर्णधार भडकला, म्हणला…
- सावधान! मुंबई, ठाण्यात बोगस लसींचा सुळसुळाट, ५ जणांविरोधात गुन्हा दाखल
- लंकादहन करण्यासाठी गब्बर सेना सज्ज ; बीसीसीआयने शेअर केला खास व्हिडिओ
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
