मुंबई : जुलैमध्ये टीम इंडिया श्रीलंकेचा दौरा करणार आहे. 13 जुलैपासून सुरू झालेला हा दौरा 25 जुलैपर्यंत सुरू राहणार आहे. श्रीलंकेत टीम इंडिया तीन एकदिवसीय सामने आणि तब्बल टी -20 सामने खेळणार आहे. या दौर्याची सुरुवात वनडे मालिकेपासून होईल. पहिला एकदिवसीय सामना 13 जुलै रोजी, दुसरा 16 रोजी आणि तिसरा वनडे 18 रोजी खेळला जाईल. यावेळी श्रीलंका दौर्यावर जाणारी टीम इंडिया पूर्णपणे वेगळी असणार आहे. यावेळी विराट कोहली आणि रोहित शर्मासह इंग्लंड दौऱ्यावर असणारा संघ नसणार आहे.
विराट आणि रोहितच्या अनुपस्थितीत संघाचे नेतृत्व शिखर धवन करणार आहे. विराट कोहली आणि रोहित शर्माशिवाय टीम इंडिया मर्यादित षटकांची मालिका खेळण्याची ही पहिली वेळ असेल. जर नियमित कर्णधार विराट कोहली कोणत्याही मालिकेत न खेळला तर रोहित शर्माने कर्णधारपद स्वीकारले. परंतु जर दोघे श्रीलंका दौर्यावर नसतील तर धवन टीम इंडियाचे नेतृत्व करेल. टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री इंग्लंडममध्ये भारतीय संघासोबत व्यस्त असणार आहेत. अशा परिस्थितीत माजी फलंदाज राहुल द्रविड श्रीलंका दौर्यासाठी कोचिंगची जबाबदारी सांभाळणार आहेत.
Brand "New Video" Alert ⚡️⚡️
New faces ????
New beliefs ????
New energy ????#TeamIndia's talented newbies speak about their run of emotions after getting out of quarantine, hitting the gym & gearing up for Sri Lanka series. ???? ???? #SLvINDFull video ???? ????https://t.co/sHsi9LG6ii pic.twitter.com/1muHP2uaQ8
— BCCI (@BCCI) June 25, 2021
श्रीलंका दौऱ्यासाठी टीम मुंबईमध्ये पोहचली आहे. श्रीलंकेला जाणारी टीम मुंबईत आपला विलगीकरण कालावधी पूर्ण करत आहे. त्यासोबतच श्रीलंका दौऱ्याची जोरदार तयारी देखील करत आहेत. खेळाडूंना एकत्र येऊन सराव करण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे हे खेळाडू जिम सेशनमध्ये घाम गाळताना दिसून येत आहेत. याचाच एक व्हिडीओ बीसीसीआयने आपल्या अधिकृत ट्विटरवर शेअर केला आहे. शेअर केलेल्या व्हिडिओत खेळाडू जोरदार मेहनत घेताना दिसत आहेत. मुंबईतील विलगीकर कालावधी सम्पल्यानंतर ३० जुन रोजी भारतीय संघ श्रीलंकेला रवाना होईल. तिथे त्यांना काही दिवस विलगीकरणात राहिल्यानंतर सराव करण्यास परवानगी मिळेल.
महत्वाच्या बातम्या
- इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी भारतीय खेळाडू तीन आठवडे सुट्टीवर ; माजी कर्णधार भडकला, म्हणला…
- अनिल देशमुखांना १० बार मालकांनी चार कोटी रुपये दिले ;EDची माहिती
- राज्यात आज १०,१३८ रुग्ण कोरोनामुक्त तर ‘इतक्या’ नव्या रुग्णांची नोंद
- कौतुकास्पद! औरंगाबादकरांची ‘माझी स्मार्ट बस’ देशात पहिली
- यादीतील उमेदवारांची २०१८ पासून ‘प्रतिक्षा’ संपेना, आझाद मैदानात आंदोलनाचा इशारा


