मुंबई : कोरोना महामारीच्या काळात लस ही महत्त्वाची अस्त्र झाली आहे. त्यामुळे लसीकरणावर अधिक भर दिला जात आहे. त्यातच आता मुंबईतील बोगस कोविड लसीकरण प्रकरण गाजत असतानाच या प्रकरणात मुंबई पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींनी ठाण्यातही एका विमा कंपनीतील कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांचे बोगस लसीकरण केल्याचा प्रकार समोर आला आहे.
आरोपींनी प्रत्येक लसमागे एक हजार रुपयांप्रमाणे १ लाख १६ हजार रुपये घेतल्याची बाब निष्पन्न झाली आहे. याशिवाय आरोपींनी चार जणांना लसीचे बनावट प्रमाणपत्र देखील दिले आहेत. मुंबईत बोगस लसीकरणाचे प्रकरण समोर आल्यानंतर यामध्ये अटकेत असलेल्या आरोपींनी ठाण्यातही हा कारनामा केल्याचे चौकशीत समोर आले होते.
त्यानंतर नौपाडा पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत आरोपी महेंद्र सिंग आणि त्याचे साथीदार श्रीकांत माने, संजय गुप्ता, सिमा अहुजा व करीम या टोळीने 26 मे 2021 रोजी लसीकरण केल्याची माहिती मिळाली. श्री जी आर्केडमधील रेन्यूबाय या कंपनीसाठी लसीकरण करण्यात आल्याचं स्पष्ट झालं. कंपनीचे कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी आयोजित या शिबिरात आरोपींनी भेसळयुक्त आणि बनावट डोस देत ते कोव्हिशिल्डचे डोस असल्याचं सांगितलं.
यासाठी प्रत्येक लसीमागे एक हजार रुपये उकळण्यात आले. एकूण 116 जणांच्या लसीकरणासाठी एक लाख 16 हजार रुपये वसुल करण्यात आले. दरम्यान आता आरोपींनी बोगस लस देऊन नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण केला. तसेच फसवणूक केल्याबद्दल कंपनीच्या अधिकाऱ्याने दिलेल्या तक्रारीनंतर पाचही जणांविरुद्ध नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या
- महाराष्ट्राने काढला पहिला नंबर ; आतापर्यंत ‘इतक्या’ कोटी लोकांचे झाले लसीकरण
- अनिल देशमुखांना १० बार मालकांनी चार कोटी रुपये दिले ;EDची माहिती
- राज्यात आज १०,१३८ रुग्ण कोरोनामुक्त तर ‘इतक्या’ नव्या रुग्णांची नोंद
- कौतुकास्पद! औरंगाबादकरांची ‘माझी स्मार्ट बस’ देशात पहिली
- यादीतील उमेदवारांची २०१८ पासून ‘प्रतिक्षा’ संपेना, आझाद मैदानात आंदोलनाचा इशारा


