Share

पासपोर्ट नूतनीकरणप्रकरणी उच्च न्यायालयाचा कंगनाला दिलासा देण्यास नकार

Published On: 

मुंबई : बॉलीवुड अभिनेत्री कंगना रनौत तिच्या धडाकेबाज वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत राहिली आहे. अनेकदा तिच्या या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाले आहेत. तिच्या या वक्तव्यामुळे ती कायमच चर्चेत राहिली आहे. मात्र यावेळी ती तिच्या पासपोर्टमुळे चर्चेत आली आहे. पासपोर्ट प्राधिकरणाने कंगनाच्या पासपोर्ट रिन्यूअल करण्यास नकार दिला आहे. त्यामुळे कंगनाने मुंबई हायकोर्टात पासपोर्ट नूतनीकरणासाठी याचिका दाखल केली होती. मात्र सुनावणी दरम्यान कंगनाला दिलासा मिळाला नाही.

कंगनाला तिच्या ‘धाकड’ सिनेमाच्या शूटिंगसाठी हंगेरी या देशात जायचं आहे. मात्र कंगनाचा पासपोर्ट १५ सप्टेंबरपर्यंतच वैध असल्याने तिला पासपोर्टचं तातडीने नूतनीकरण करणं गरजेचं आहे. अन्यथा कंगनाला परदेशवारी करण्यात मर्यादा येऊ शकतात. यासाठीच कंगनाने हायकोर्टात याचिका दाखल केली. मंगळवारी या याचिकेवर सुनावणी झाली आणि सुनावणी दरम्यान न्यायालयाने कंगनाला पुन्हा नवी याचिका दाखल करण्याचे निर्देश दिले. आणि  सुनावणी २५ जूनपर्यंत पुढे ढकलली गेली. या याचिकेवर सुनावणी करताना हायकोर्टाने काही आक्षेप नोंदवले आहेत.

काल झालेल्या सुनावणीत पासपोर्ट नूतनीकरण प्रकरणात उच्च न्यायालयाने अभिनेत्री कंगना रनौतला तातडीचा दिलासा देण्यास नकार दिला.
न्या. एस. एस. शिंदे, न्या. जी. ए. सानप यांनी कंगनाचे वकील रिझवान सिद्दिकी यांना अन्य खंडपीठापुढे याचिकेवर तातडीची सुनावणी घेण्यासाठी अर्ज करण्याची परवानगी दिली. तसेच तिचा आगामी चित्रपट ‘धाकड’च्या निर्मात्यालाही बाजू मांडण्याची मुभा दिली. कंगनावर देशद्रोहाचा गुन्हा असल्याने पासपोर्ट प्रशासनाने पासपोर्टच्या नूतनीकरण केले नाही.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!