🕒 1 min read
परभणी: येथील वसमत रस्त्यावर काली कमान समोर शुक्रवारी दि. २५ जून रोजी सकाळी शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने ‘रास्ता रोको’ आंदोलन करण्यात आले. अधुनमधुन सुरु असलेल्या टाळेंबदीमध्ये देशातील केवळ शेती व्यवसाय शेतकऱ्यांनी सुरु ठेवून अर्थचक्राला गती देण्यात मोलाचे योगदान दिले आहे. सध्या खरीप पेरणीची लगबग सुरु झालेली आहे. या महत्वाच्या वेळेला पिककर्जाच्या रुपात योग्य वेळी मदत होणे गरेजेचे असताना मात्र बँकांकडून वेळेवर मदत मिळत नाहीये.
जिल्ह्यातील पिककर्जाची गती अत्यंत मंदावलेली आहे तसेच महात्मा ज्योतीबा फुले कर्जमाफी योजनेअंतर्गत शासन शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांची कर्ज माफी देणार होते. त्या शेतकऱ्यांना अद्यापही कर्ज माफी दिलेली नाही. पेरणीच्या पार्श्वभूमीवर बियाणे आणि खताचा कृत्रिम तुटवडा निर्माण करून जास्त दराने विक्री सुरु आहे. गेल्या हंगामातील ऊस गाळप होऊन बराच कालावधी जाऊनही साखर कारखाने शेतकऱ्यांना त्याचा दाम देण्यास पूर्णत्वाला उतरले नाही. या सर्व समास्यांमुळे स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्यावतीने जिल्ह्यातील शेतकऱ्यांसह कार्यकर्त्यांनी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठासमोर गुरुवारी सकाळी अर्धातास रस्ता रोको केला.
जिल्ह्यातील पिककर्ज वाटपाची गती वाढविण्यात यावी, जाचक अटी, नियम व कागदपत्राची मागणी बंद करण्यात यावी, महात्मा ज्योतीबा फुले कर्जमाफी योजना रखडलेली आहे. त्या योजनेनुसार पात्र शेतकऱ्यांना लवकरात लवकर लाभ देण्यात यावा, दोन लाख रुपयांच्या वरील रक्कम असलेल्या कर्ज खात्याची गतीने निवड करून रक्कम वितरित करण्यात यावी, नियमित कर्जफेड करण्याऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार प्रोत्साहनपर रक्कम शासनाने जाहिर केलेली देण्यात यावी, आशा मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले.
महत्वाच्या बातम्या
- मुलानेच केली पित्याची हत्या! अडीच महिन्यानंतर शवविच्छेदन अहवालातून प्रकार आला समोर
- ‘त्या’ व्यावसायिकाचे कुणाशी संबंध आहेत हे सगळ्या पुण्याला माहिती – प्रविण दरेकर
- ‘कलम ३७० आमची ओळख, त्यासाठी सदैव लढा देणार’ मेहबूबा मुफ्तींची प्रतिक्रिया
- भाजपचे सर्व नेते धुतल्या तांदळाचे, EDची पिडा फक्त विरोधकांच्या मागेच का ?
- ‘…तरीही अनिल देशमुखांच्या घरावर ईडीची छापेमारी का ?’; सचिन सावंतांचा भाजपवर हल्लाबोल

