मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपूरमधील निवासस्थानी सक्तवसुली संचालनायलयाने (ईडी) छापा टाकला आहे. शुक्रवारी सकाळी ईडीने देशमुख यांच्या जीपीओ चौकातील निवासस्थानी तसंच त्यांच्या निकटवर्तीयांकडे छापे टाकले. त्यामुळे अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ होण्याची दाट शक्यता आहे.
अनिल देशमुख यांच्या घरी ईडीकडून झडाझडती सुरू आहे. या तपासासाठी 6 ते 7 अधिकारी नागपुरातील देशमुखांच्या घरी पोहोचले आहेत. अनिल देशमुख यांच्या घराबाहेर बंदोबस्तासाठी सीआरपीएफचे जवान तैनात करण्यात आले आहेत. दरम्यान, झाडाझडती होताना अनिल देशमुख घरी नव्हते, तर त्यांची पत्नी आणि इतर कुटुंबीय उपस्थित होते.
आता अनिल देशमुख यांच्यावर ईडीकडून करण्यात येत असलेल्या या कारवाईवर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येण्यास सुरवात झाली आहे. काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी या कारवाईवर आक्षेप घेतानाच भाजपवर हल्लाबोल केला आहे.
लोकशाही वाचवण्यासाठी मविआ सरकारला बदनाम करण्याचा मोदी सरकारचा डाव तीनही पक्षांनी हाणून पाडला पाहिजे.विरोधकांचा छळ करण्यासाठी तपास यंत्रणांचा वापर केला जात आहे. आरोपकर्ते आर्थिक देवाण-घेवाण झाली नाही असे म्हणत असतानाही अनिल देशमुख यांच्या घरावर छापेमारी करणाऱ्या इडीने उत्तर द्यावे pic.twitter.com/78U7vQ2uX5
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) June 25, 2021
‘लोकशाही वाचवण्यासाठी मविआ सरकारला बदनाम करण्याचा मोदी सरकारचा डाव तीनही पक्षांनी हाणून पाडला पाहिजे.विरोधकांचा छळ करण्यासाठी तपास यंत्रणांचा वापर केला जात आहे. आरोपकर्ते आर्थिक देवाण-घेवाण झाली नाही असे म्हणत असतानाही अनिल देशमुख यांच्या घरावर छापेमारी करणाऱ्या इडीने उत्तर द्यावे,’ अशी मागणी सचिन सावंत यांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- केंद्र सरकार आपल्या कर्तव्यात चुकल्यामुळेच ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द झाले – जयंत पाटील
- आणीबाणी : फक्त एका कुटुंबाच्या हिताचे रक्षण करण्यासाठी लोकशाहीचे वस्त्रहरण करण्यात आले
- सोन्याच्या दागीन्यांसह कपड्यावर मारला होता बुरखा गँगने डल्ला, सिटीचौक पोलिसांकडून तपासात उघड
- आंबिल ओढा कारवाईनंतर अजित पवारांची पुण्यातील आढावा बैठकीला दांडी; चर्चांना उधाण
- ‘मोठी गोष्ट सहज मिळत नाही’ ; पराभवानंतर शास्त्रींची पहिली प्रतिक्रिया
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

