औरंगाबाद : वाळूज महानगरातील साईनगर भागात अडीच महिन्यापूर्वी ५५ वर्षीय राजेश रामकृष्ण मुसळे यांचा तोल जावून मृत्यू झाल्याचे त्यांच्या परीवाराकडून सांगण्यात आले होते. मात्र, शरीरावरील जखमा पाहून पोलिसांना संशय आला होता. त्यानंतर आता शवविच्छेदन अहवाल पोलिसांना प्राप्त होताच, मुसळे यांचा तोल जावून मृत्यू झाला नसून हत्या करण्यात आल्याचे समोर आले. यावरून तपासात त्यांच्या मुलाने हत्या केल्याचे निष्पन्न झाले.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, घरात तोल जावून बेशुद्ध पडल्यामुळे, राजेश मुसळे यांना त्यांचा मुलगा ऋषीकेश राजेश मुसळे वय २३ याने त्यांना घाटी रुग्णालयात आणले. त्यांना डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले. हा सर्व प्रकार घाटी पोलिसांनी एमआयडीसी वाळूज पोलिसांना कळवला, त्यावरून त्यांनी सुरुवातीला या गोष्टीची नोंद घेत या प्रकरणाचा तपास उपनिरीक्षक पागोटे यांना दिलां. त्यानुसार पागोटे यांनी पंचनामा केला, प्रार्थमिक अहवालात डोक्याला आणि छातीला मुका मार लागल्याने मृत्यू झाल्याचा अभिप्राय डॉक्टरांनी दिला.
त्यावरून पोलिसांचा संशय बळावल्याने त्यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांशी पत्र व्यवहार सुरु केला. पंचनाम्यात नमूद जखमाविषयी त्यांनी डॉक्टरांना विचारले त्यानंतर त्यांना सखोल अभिप्राय देण्यात आला. त्यात मुसळे यांचा मृत्यू मारहाण झाल्यामुळे झाला असावा असे मत व्यक्त करण्यात आले. त्यानुसार पोलिसांनी परिवाराची कसून चौकशी केल्यानंतर दारू पिऊन मारहाण करण्याच्या सवयीमुळे ऋषीकेश याच्या मारहाणीत मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी ऋषीकेश मुसळे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- #HBD : मराठी चित्रपटसृष्टीतील ग्लॅमरस अभिनेत्री ‘सई ताम्हणकरला’ वाढदिवसाच्या शुभेच्छा…
- कर्णधार कोहलीचा ‘बेस्ट ऑफ थ्री’ला पाठिंबा, म्हणाला…
- मराठवाड्याला अतिरीक्त पाणी देण्याचे सरकारचे नियोजन- जयंत पाटील
- खासगी कोचिंग क्सासेससाठी आमदार अंबादास दानवे यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे शिष्टाई
- ‘मोठी गोष्ट सहज मिळत नाही’ ; पराभवानंतर शास्त्रींची पहिली प्रतिक्रिया
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

