Share

‘त्या’ व्यावसायिकाचे कुणाशी संबंध आहेत हे सगळ्या पुण्याला माहिती – प्रविण दरेकर

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : पुण्यात काल आंबिल ओढा अतिक्रमण हटाव मोहिमेविरोधात जो गोंधळ झाला त्यावर पुणे महापालिकेला जबाबदार ठरवण्यात आले. महानगरपालिकेची सत्ता भाजपकडे असली तरी, उपमुख्यमंत्री अजित पवार पुण्याचे आहेत. ते तेथील पालकमंत्री आहेत. पुण्याचे नेतृत्व अजित दादा करत असतात. त्यामुळे, महापालिका आमची आहे म्हणून महापालिकेला जबाबदार ठरविणार का ? असा सवाल करत सरकार जनतेसाठी काम करत असतं, जनतेवर अन्याय करून, जनतेला त्रास देऊन कोणताही विकास होता कामा नये असा इशाराही विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी यावेळी दिला.

पुण्यात काल आंबिल ओढा अतिक्रमण हटाव मोहिमेविरोधात जो गोंधळ झाला त्यावर भाजपवर टीका करण्यात आली. पुण्याचं नेतृत्व करणाऱ्यांवर ताशेरे ओढण्यात आलेत. त्यावर बोलताना दरेकर म्हणाले, पुण्यात महापलिकेमध्ये भाजपची सत्ता असताना भाजपच्या विरोधात आरोप करण्यात आले. पण जर मुंबईच्या महपालिकेचया राजावाडी रुग्णालयात आयसीयूमध्ये उपचार घेणा-या रुग्णांचा डोळा उंदराकडून कुरतडण्याचा प्रकार होतो व त्या रुग्णाचा दुदैर्वी मृत्यू होतो तेव्हा या प्रकारला सत्ताधारी शिवसेनेला जबाबदार ठरविले पाहिजे मग शिवसेना आता त्याची जबाबदार घेणार का ? असा सवाल करत दरेकर म्हणाले, सगळ्यांसाठी वेगळे नियम का ? चूक आहे ते चूक आहे, जर उद्या तपास यंत्रणेमध्ये आमचा माणूस जरी आरोपी ठरला तर त्याला शिक्षा झाली पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

काल पुण्यात आंबिला ओढ्याच्या कारवाईचा प्रकार अतिशय हृदय हेलावणारा होता. घटनेनंतर महिलांच्या प्रतिक्रिया येत होत्या. पाच सहा वर्षाचा मुलगा रडत रडत आपली व्यथा मांडत होता. अजित पवार अनेक विषयावर बैठका घेतात आणि त्या विषयाला न्याय देण्याचा प्रयत्न करत असतात. अनेक ठेकेदार त्यांच्या वर्चस्वालाखाली किंवा आशीर्वादाने काम करत आहे. या प्रकरणाचा अजित दादांच्या संबंध असेल तर स्वभाविक त्यांना विचारलं जाईल. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी या प्रकरणाविषयी काल प्रतिक्रिया दिली. राजकीय आरोप झाले, एसआरएचा प्रोजेक्ट आहे म्हणून पालिकेनं कारवाई केली पण आमचा काही संबंध नाही. सत्य परिस्थिती काय आहे हे पुणेकरांना माहित आहे. कुणाच्या दबावाखाली येऊन हे काम केलं, त्या व्यावसायिकाचे कुणाशी संबंध आहेत ते सगळ्या पुण्याला माहित आहेत. त्यामुळे महानगर पालिका भाजपची असली तरी उपमुख्यमंत्री पुण्याचे पालकमंत्री आहेत. त्यामुळे अशी कारवाई होणे अपेक्षित नाही. संपूर्ण महाराष्ट्रासह पुण्याचा कारभार अजितदादा चालवत आहेत त्यामुळे सर्व बाबी त्यांना ठाऊक असाव्यात अशी टीका दरेकर यांनी यावेळी केली.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!