कोलकत्ता : गेल्या काही दिवसांपूर्वी पश्चिम बंगालमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये ममता बॅनर्जींच्या तृणमूल कॉंग्रेस या पक्षाने भाजपला चारही मुंड्या चीत करून बंगालमधील विधानसभा काबीज केली आहे. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसने पुन्हा एकदा एकहाती बहुमत मिळवलं असून भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासारखे नेते प्रचाराच्या रणधुमाळीत उतरवून देखील दोन अंकी जागांवरच समाधान मानावं लागलं आहे.
परंतु पूर्वीचे ममता दीदींचे खंदे समर्थक मानले जाणरे सुवेंदू अधिकारी यांनी भाजपमध्ये जावून ममता बॅनर्जींचा पराभव केला. त्यानंतर भाजपने त्यांना विरोधी पक्षनेते पदाचा कार्यभार हाती दिला. परंतु आता भाजपा आमदार आणि बंगाल विधानसभेतील विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांच्या विरोधात चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. अधिकारी यांनीच विधानसभा निवडणुकीत नंदीग्राममधून ममता यांचा पराभव केला होता. पूर्व मिदानपूर जिल्ह्यात सुवेंदू अधिकारी आणि त्यांच्या भावाच्या विरोधात चक्रीवादळ पीडितांना देण्यासाठी आणलेले साहित्य चोरल्याचा गुन्हा तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दाखल केला आहे.
कोंटाई नगरपालिकेच्या व्यवस्थापन मंडळाचे सदस्य असलेल्या रत्नदीप मन्ना यांनी याबाबतची लेखी तक्रार दिली आहे. त्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तक्रारीनुसार, ‘हिंंमाशू मन्ना आणि प्रताप डे या दोन व्यक्तींनी 29 मे रोजी नगरपालिकेच्या गोदामातून ताडपत्रींनी भरलेला ट्रक चोरला आहे. या सर्व प्रकरणात सुवेंदू अधिकारी आणि त्यांचे बंधू सौमेंदू अधिकारी यांचा हात आहे,’ असा आरोप या तक्रारीमध्ये करण्यात आला आहे. या सर्वांनी केंद्रीय सुरक्षा दलाच्या संगनमताने ही चोरी केल्याचा दावा देखील तक्रारीमध्ये करण्यात आला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘विनाकारण गर्दी करू नका, अन्यथा कठोर निर्णय घेईल’ ; अजितदादांचा पुणेकरांना इशारा
- ‘सोयाबीन बियाणे मुबलक प्रमाणात उपलब्ध करा’, शिवसेना खासदाराचे ‘महाबीज’ला पत्र
- ६२ दिवसांनंतर जालना जिल्हा उद्यापासून होणार अनलॉक
- विनायक मेटेंच्या पुढील सर्व आंदोलनात भाजप सहभागी होणार-आशिष शेलार
- शनिवारी फक्त दिव्यांगांनाच लस; बीडचा ‘स्पेशल डे’ पॅटर्न राज्यात राबवणार-धनंजय मुंडे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

