Share

६२ दिवसांनंतर जालना जिल्हा उद्यापासून होणार अनलॉक

Published On: 

🕒 1 min read

जालना : दोन महिन्यानंतर म्हणजे तब्बल ६२ दिवसांनंतर उद्या सोमवारपासून जालना जिल्हा अनलॉक होत आहे. राज्यातील ज्या १८ जिल्ह्यात अनलॉक केले जाणार आहे, त्यात जालन्याचा समावेश असल्यामुळे ही जिल्हावासियांसाठी सुखद बातमी ठरणार आहे. दरम्यान, रूग्ण संख्या तसेच त्यानुसार तेथील सेवांसाठी लादल्या जाणाऱ्या अटी शर्थी असणार आहे. यासाठी निर्बध लावले जाणार असून त्याचे एकूण पाच स्तर ठरवण्यात आलेले आहे. स्थितीनुसार नागरीकांना परिस्थितीला सामोरे जावे लागेल.

दुसरी लाट ओसरत असली तरी कोरोनाचा संसर्ग हे आपल्यासाठी अजूनही आव्हानच आहे. याला रोखण्यासाठी शासनाने सुयोग्य पद्धतीने निर्बंधासाठी निकष आखले असून तशा पातळ्या ठरवल्या आहेत. यानुसार नागरिकांनी कोरोना काळात आरोग्याचे सर्व नियम पाळून तसेच कोविड सुसंगत वर्तणूक ठेवून आपापल्या जिल्हा प्रशासनाने घेतलेल्या निर्णयास सहकार्य करायचे आहे, असेही राज्य शासनाने स्पष्ट केले आहे.

काय आहेत अनलॉकचे नियम?
विविध प्रकारची धार्मिक स्थळे हे स्थानिक प्रशासनाच्या नियमांनुसार राहणार
खासगी कार्यालये शासकीय कार्यालयात १०० टक्के कर्मचाऱ्यांची ठेवता येईल उपस्थिती
लग्न समारंभात दालनाच्या ५० टक्के क्षमतेइतके, कमाल १०० व्यक्तींची उपस्थिती
अत्यावश्यकसह इतर वस्तूंची दुकाने, मॉल, चित्रपटगृहे (एकल), स्क्रीन असलेले मल्टिप्लेक्स, नाट्यगृह, उपाहारगृहे.
सर्व उत्पादन केंद्रे ५० टक्के कर्मचारी, वाहतूक बबल ५० टक्के क्षमतेत ये-जा
सार्वजनिक ठिकाण, पटांगण, वॉकिंग, सायकलिंग, खासगी कार्यालये शासकीय कार्यालयात १०० टक्के उपस्थिती
शेती, ई-कॉमर्स साहित्य व सेवा पुरवठा जमावबंदी किंवा संचारबंदी नाही.कोरोना प्रतिबंधक नियमांचे
पालन करून वाहतूक सेवा राहील सुरू
गावातील एकल दुकाने सेवा देणारी केंद्रे करता येईल सुरू
जिल्ह्यातील जिम, सलून, सौंदर्य केंद्र, स्पा, वेलेनस केंद्र, सामाजिक, सांस्कृतिक, मनोरंजन कार्यक्रमांना असेल लोकांची उपस्थिती

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!