🕒 1 min read
नांदेड : बीड शहरामध्ये मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी शनिवारी शिवसंग्राम पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तथा आमदार विनायकराव मेटे यांच्या नेतृत्वाखाली मराठा क्रांती संघर्ष मोर्चा काढण्यात आला. दरम्यान, आत्मनिर्भर राज्य सरकारचा नाकर्तेपणा, हलगर्जीपणा आणि सूडबुद्धीमुळे मराठा आरक्षण गेले. त्यामुळे सरकारविरोधात विनायक मेटे किंवा मराठा संघटना आंदोलन करीत असतील तर त्यात काही गैर नाही. पक्षीय मतभेद बाजूला ठेवून भाजपही त्या आंदोलनात सहभागी होईल, अशी माहिती भाजपचे प्रदेश प्रवक्ते आणि माजी मंत्री आशिष शेलार यांनी दिली.
नांदेड येथे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या निवासस्थानी शनिवारी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ओबीसी, आरक्षण, कोरोना नियंत्रणाबाबतही शेलार यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली. महाविकास आघाडी सरकारने हाताने घालवलेले मराठा आरक्षण तसेच त्यांनी मराठा समाजाची केलेली धूळफेक या मुद्द्यावरून नांदेडचा ‘करंट’ घेऊन आगामी अधिवेशनात सरकारला चांगलाच ‘शॉक’ देणार असे शेलार म्हणाले.
ठाकरे सरकारच्या निष्क्रिय कारभारामुळे तसेच मराठा उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या मनमानी कारभारामुळे सर्वोच्च न्यायालयात योग्य पुरावे सादर न केल्याने न्यायालयाने मराठा समाजाला आरक्षण नाकारले आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यास अपयशी ठरलेले महाविकास आघाडीचे नेते या बाबत केंद्र सरकारकडे बोट दाखवत आहे असा आरोप आशिष शेलार यांनी केला.
महत्त्वाच्या बातम्या
- शनिवारी फक्त दिव्यांगांनाच लस; बीडचा ‘स्पेशल डे’ पॅटर्न राज्यात राबवणार-धनंजय मुंडे
- वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप स्पर्धेत टीम इंडिया उठवणार ‘या’ गोष्टीचा फायदा!
- महाराष्ट्र सावरतोय ; राज्यातील कोरोना रुग्णसंख्येतील घट कायम
- मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचं गूढ वाढलं, अहवालातून धक्कादाय माहिती आली समोर
- लिंब, बेहडा, बांबू, ताम्हणसह औरंगाबाद मनपाने केली १० हजार वृक्षांची लागवड
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
