Share

‘विनाकारण गर्दी करू नका, अन्यथा कठोर निर्णय घेईल’ ; अजितदादांचा पुणेकरांना इशारा

Published On: 

पुणे : महाराष्ट्रात सोमवारपासून ५ टप्प्यात अनलॉक करण्यात येणार आहे. यात पहिल्या टप्प्यात १८ जिल्ह्यांचा समावेश असणार आहे. या १८ जिल्ह्यात आता दुकाने, हॉटेल, सिनेमागृह, वाहतूक सर्व काही सुरु केले जाईल. तर दुसऱ्या टप्प्यात येणाऱ्या जिल्ह्यात ५० टक्के अनलॉक असेल. 3 जून रोजी संपलेल्या आठवडयाच्या सरासरीनुसार पॉझिटिव्हीटीचे दर आणि भरलेल्या ऑक्सिजन बेडच्या प्रमाणावर प्रत्येक शहरातील प्रशासन त्यांची नियमावली स्वतंत्र काढेल असं सांगण्यात आलं होते.

त्याप्रमाणे पुणे महापालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांनी पुणे शहरासाठी मिशन बिगेन अगेन म्हणजे अनलॉकची नियमावली जाहीर केली असून त्याबाबतचे आदेश आज (शनिवार) काढण्यात आले आहेत. सध्या निर्बंध शिथिल करण्यात आले आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिक बाहेर पडत आहे. गर्दी अशीच वाढत राहिली तर नाईलाजास्तव काही कठोर निर्णय घ्यावे लागतील. असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणेकरांना दिला आहे.

त्यामध्ये एका बाजूची दुकाने दिवसाआड सुरू ठेवण्याचा निर्णय घ्यावा लागेल. हे टाळण्यासाठी नागरिकांनी विनाकारण बाहेर न पडता तसेच गर्दी न करता कोरोना रोखण्यासाठी आवश्यक नियमांचे पालन करावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले आहे. पवार म्हणाले, शहरात कोरोना नियमांचे उल्लंघन होत आहे. सध्या शहराचा पॉझिटिव्हिटी रेट कमी झाला आहे, याचा अर्थ कोरोना पूर्ण संपला आहे असा होत नाही. नागरिकांनी आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. असेही ते म्हणाले आहेत.

पुणे महापालिकेची नियमावली पुढील प्रमाणे :

  • शहरातील हॉटेल, बार, रेस्‍टॉरंट, फूड कोर्ट सोमवार ते शुक्रवार सायंकाळी चार वाजेपर्यंत सुरू राहतील
  • महानगरपालिका हद्दीतील सार्वजनिक ठिकाणे, उद्याने, मैदाने पहाटे पाच ते सकाळी नऊ वाजेपर्यंत सुरू राहतील
  • सामाजिक धार्मिक व मनोरंजन कार्यक्रमासाठी पन्नास लोकांच्या उपस्थितीत सोमवार ते शुक्रवार दुपारी चार वाजेपर्यंत परवानगी
  • लग्नसमारंभासाठी पन्नास लोकांच्या उपस्थितीतीला परवानगी
  • व्यायाम शाळा, सलून, ब्युटी पार्लर, स्पा आसन क्षमतेच्या 50 टक्के क्षमतेने दुपारी चार वाजेपर्यंत सुरू राहतील
  • पी एम पी एम एल 50 टक्के क्षमतेने सुरू करण्यास परवानगी
  • आंतरजिल्हा बंदी उठवण्यात आली आहे
  • खासगी कार्यालये कामाच्या दिवशी 50 टक्के कर्मचारी क्षमतेने दुपारी 4 वाजेपर्यंत सुरू राहतील.
  • लोकल ट्रेनमध्ये फक्त वैद्यकीय सेवेतील तसेच अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, महिला, शासकीय कर्मचारी, विमानतळ सेवा, बंदरे सेवा यांच्या कर्मचाऱ्यांना प्रवास करता येईल.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!