🕒 1 min read
उस्मानाबाद : खरीप हंगाम जवळ आल्याने शेतकरी बांधव खते व बियाणे खरेदी करण्यासाठी कृषी निविष्ठाधारक दुकानांमध्ये गर्दी करीत आहेत. प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही शेतकऱ्यांमधून महाबीज कंपनीच्या बियाण्यांची मागणी जास्त आहे. परंतु जिल्ह्याला अद्याप मागणीनुसार पुरेशा प्रमाणात महामंडळाकडून बियाणे उपलब्ध करुन देण्यात आले नाही. महाबीजने पुरेशा प्रमाणात सोयाबीन बियाणे उपलब्ध करून द्यावे, अशा मागणीचे पत्र खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी महाबीजच्या महाव्यवस्थापकांना दिले आहे.
पत्रात म्हटले आहे की, अपुऱ्या प्रमाणात बियाणांचा पुरवठा झाल्याने शेतकरी बांधवांना बियाणे खरेदीसाठी विविध गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः गतवर्षी सोयाबीन काढणीच्या वेळेत जिल्ह्यात अतिवृष्टी होऊन ७० टक्के पेक्षा जास्त सोयाबीन पिकांचे नुकसान झाले होते. यामुळे यंदा शेतकऱ्यांकडे घरगुती बियाणेदेखील उपलब्ध नाही. तरी शेतकरी बांधवांना वेळेवर व पुरेशा प्रमाणात बियाणे उपलब्ध करुन देणे अत्यंत गरजेचे आहे.
जिल्ह्याची सोयाबीन बियाण्यांची मागणी ५० हजार क्विंटल इतकी असून, आतापर्यंत केवळ ११ हजार क्विंटल एवढे बियाणे उपलब्ध झाले आहे. सीड प्लॉटची मागणी ६ हजार हेक्टरसाठी २५०० शेतकऱ्यांनी केली आहे. त्यापैकी १२०० हेक्टर क्षेत्रासाठी १३७७ शेतकऱ्यांना मिळू शकतील इतके बियाणे उपलब्ध झाले आहे. उर्वरित शेतकरी सीड प्लॉट व साधारण बियाण्यांपासून वंचित राहण्याची शक्यता आहे. आगामी खरीप हंगामासाठी महाबीज कंपनीचे सोयाबीन बियाणे मुबलक प्रमाणात उपलब्ध करण्यासंदर्भात महाव्यवस्थापकांकडे मागणी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ६२ दिवसांनंतर जालना जिल्हा उद्यापासून होणार अनलॉक
- विनायक मेटेंच्या पुढील सर्व आंदोलनात भाजप सहभागी होणार-आशिष शेलार
- शनिवारी फक्त दिव्यांगांनाच लस; बीडचा ‘स्पेशल डे’ पॅटर्न राज्यात राबवणार-धनंजय मुंडे
- वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप स्पर्धेत टीम इंडिया उठवणार ‘या’ गोष्टीचा फायदा!
- महाराष्ट्र सावरतोय ; राज्यातील कोरोना रुग्णसंख्येतील घट कायम
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
