Share

शनिवारी फक्त दिव्यांगांनाच लस; बीडचा ‘स्पेशल डे’ पॅटर्न राज्यात राबवणार-धनंजय मुंडे

Published On: 

बीड : बीड जिल्हा आरोग्य प्रशासनाने शनिवारी जिल्ह्यातील सर्व लसीकरण केंद्रांवर एक दिवस राखीव ठेवत दिव्यांग व्यक्तींसाठी विशेष लसीकरण मोहीम राबवली. या मोहिमेचा परळीतील लोकनेते गोपीनाथराव मुंडे नटराज रंगमंदिर येथील लसीकरण केंद्रावर मंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. दरम्यान, बीडचा हा स्पेशल डे पॅटर्न राज्यभर राबवू, असे मुंडे म्हणाले. शनिवारी १३२० जणांचे लसीकरण झाले, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी आर. बी. पवार यांनी दिली.

दिव्यांग व्यक्तींना लसीकरण केंद्रावर ये-जा करणे, यासह अन्य अडचणींचा विचार करून सामाजिक न्याय विभागाने दिव्यांग व्यक्तींचे प्राधान्याने लसीकरण करावे याबाबत मार्गदर्शक सूचना जारी केल्या होत्या. त्यानुसार एक दिवस फक्त दिव्यांग व्यक्तींच्या लसीकरणासाठी राखीव ठेवून प्राधान्याने त्यांचे लसीकरण करण्याच्या या विशेष मोहिमेची बीड जिल्ह्यातून सुरुवात झाली आहे. ही मोहीम संपूर्ण राज्यात राबवण्याचा आपला मानस आहे, असे मत या वेळी धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले.

मृत्युसत्र कायम
जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्येत घट होवू लागल्याने समाधान व्यक्त होत असतानाच दुसरीकडे मृत्युसत्र मात्र कायम आहे. शुक्रवारी जिल्ह्यात १० रुग्णांच्या मृत्यूची नोंद आरोग्य विभागाकडे झाली. तसेच २६५ नवे रुग्ण निष्पन्न झाले तर ५६९ कोरोनामुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. आता जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या ८७८९४ झाली असून यापैकी ८२ हजार २५९ रुग्ण कोरोनामुक्त झाले तर आतापर्यंत २०३२ जणांचा बळी गेला. सध्या जिल्ह्यात ३६०३ रुग्ण उपचाराधीन असल्याची प्रशासनाकडून सांगण्यात आले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!