मुंबई – केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचे तीव्र पडसाद उमटत आहेत. राणेंच्या वक्तव्यानंतर शिवसेना-भाजप आमने-सामने आले आहेत. शिवसेनेचे नाशिकमधील शहाराध्यक्ष सुधाकर बडगुजर यांनी नारायण राणेंविरोधात तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, मुंबईतील राणेंच्या बंगल्याजवळ युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार आंदोलन केले असून भाजप आणि शिवसेनेचे कार्यकर्ते भिडले होते. यावेळी काहीप्रमाणात दगडफेक सुद्धा झाली असून यात काही पोलीस जखमी झाल्याचे देखील सांगितले जात आहे. दोन्ही बाजूने जोरदार घोषणा दिल्या जात असून मोठा तणाव सध्या त्याठिकाणी पाहायला मिळत आहे. यावेळी पोलिसांना याठिकाणी सौम्य लाठीचार्ज करावा लागला.
यावेळी वरुण सरदेसाई म्हणाले की, आव्हान देण्याची भाषा राणेंकडून करण्यात आली होती. आपण त्यांच्या बंगल्याबाहेर जमलो, मात्र उंदिर आधीच पळून गेले होते. नारायण राणेंना अटक व्हायलाच हवी. शिवसेनेचे पक्षप्रमुख हे मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचा सन्मान करण्यासाठी कुठलाही कायदा-सुव्यवस्था हातात घ्यायचं नाही. ज्यांनी आव्हान दिलं ते आम्ही स्वीकारलं. त्यामुळे युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन नारायण राणे यांना अटक करायची ही मागणी करायची आहे. तसेच ज्या पोलिसांनी युवासेनेच्या कार्यकर्त्यांना मारलं त्यांनाही निलंबित करण्याची मागणी सरदेसाईंनी केली आहे.
नारायण राणे नेमकं काय म्हणाले होते ?
‘देशाच्या स्वातंत्र्याला किती वर्षे झाली हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना माहिती नाही. कुणाला तरी विचारतात हिरक महोत्सव आहे काय? मी असतो तर कानाखाली चढवली असती. देशाच्या स्वातंत्र्यदिनाची माहिती नसावी? किती चीड आणणारी गोष्ट आहे. बाजुला एखादा सेक्रेटरी ठेव आणी बोल म्हणावं. सरकार कोण चालवतंय ते कळतच नाही. ड्रायवरच नाही’, असे भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी म्हटले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- औरंगाबादेत शिवसेना आक्रमक! कोंबड्या सोडत नारायण राणेंच्या पोस्टरला मारले जोडे
- नारायण राणेंच्या घराबाहेर शिवसेना-भाजप कार्यकर्त्यांचा तुफान राडा, पोलिसांचा लाठीचार्ज; पाहा हा व्हिडिओ
- ‘नारायण राणे छक्का है, नारायण राणे भडवा है!’, संतप्त शिवसैनिकांची घोषणाबाजी
- ‘माझी बदनामी केली तर तुमच्याविरोधात गुन्हा दाखल करेन’, नारायण राणेंची वृत्तवाहिन्यांना धमकी
- ‘मुख्यमंत्री ठाकरेंकडून राष्ट्रदोह घडला, त्यावेळी का शांत होतात?’ राणे पत्रकारांवर घसरले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

