Share

‘माझी बदनामी केली तर तुमच्याविरोधात गुन्हा दाखल करेन’, नारायण राणेंची वृत्तवाहिन्यांना धमकी

Published On: 

रत्नागिरी : नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी राज्यात वातावरण तापले आहे. शिवसैनिकांनी यावर संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यानंतर सकाळी नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेत त्यांच्यावरील आरोपांची स्पष्टीकरण दिलं आहे.

नारायण राणे यांना अटकेच्या आदेशासंबंधी विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, ‘माहितीच्या आधारे मी उत्तर देणार नाही. गुन्हा दाखल झाल्याची माझ्याकडे माहिती नाही. मी कोणताही गुन्हा केलेला नाही, तुम्ही तपासून पाहा. नाहीतर टीव्ही चॅनेल्सविरोधात मी गुन्हा दाखल करणार. गुन्हा नसताना पथक निघाले, अटक होणार सांगितले जात आहे. मी काय साधा माणूस वाटलो का?’ अशी विचारणा नारायण राणे यांनी केली. माझी बदनामी केली तर तुमच्याविरोधात गुन्हा दाखल करेन असा इशारा यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांना दिला.

मी मुख्यमंत्र्यांवर बोललो की चिथावणीखोर विधान म्हटलं जातं. मग मुख्यमंत्र्यांनी दसरा मेळाव्यात केलेल्या विधानाचं काय, असा सवाल राणेंनी विचारला. ‘भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी शिवसेना भवन फोडण्याची भाषा केली. त्यावर थपडा लगावण्याची भाषा मुख्यमंत्र्यांनी केली. ते विधान चिथावणीखोर नव्हतं का?’

‘देशाचा स्वातंत्र्यदिन कितवा हे एखाद्या मुख्यमंत्र्यांला माहीत नाही ही गोष्ट गंभीर आहे. स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव की हिरक महोत्सव ही गोष्ट मुख्यमंत्री सचिवांना विचारतात. हा देशाचा अपमान आहे. राष्ट्रद्रोह आहे. त्यावेळी तुम्ही कोठे होतात? असा सवाल त्यांनी पत्रकारांना विचारला.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!