Share

औरंगाबादेत शिवसेना आक्रमक! कोंबड्या सोडत नारायण राणेंच्या पोस्टरला मारले जोडे

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वक्तव्याचे राज्यभरात तीव्र पडसाद उमटत आहेत. मुख्यमंत्री ठाकरे यांच्या कानशिलात लगावणार असल्याचे वक्तव्य राणे यांनी केले होते. नाशिकमध्ये भाजपचे कार्यालय शिवसेनेकडून फोडण्यात आले. याच पार्श्वभूमीवर औरंगाबादमध्ये शिवसेना प्रवक्ते तथा आमदार अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली क्रांती चौकात आंदोलन करण्यात आले. यावेळी कोंबडीचोर असलेल्या नारायण राणेंनी शिवसेनाप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचा आम्ही तीव्र निषेध करतो अशी प्रतिक्रिया दानवे यांनी दिली.

केंद्रिय मंत्री राणे यांनी महाड येथे जनआशीर्वाद यात्रेदरम्यान झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री ठाकरेंबाबत खळबळजनक विधान केले आहे. महाराष्ट्रात यांच्यामुळे एक लाखा पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला. मात्र यावर काही उपाय नाही. लस नाही, डॉक्टर नाहीत, वैद्यकीय कर्मचारी नाहीत. भयावह परिस्थिती महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाची होती. मी असतो तर कानाखालीच लगावली असती. देशाच्या स्वातंत्र्य दिनाबाबत तुम्हाला माहिती नसावी? सांगा मला किती चीड येणारी गोष्ट आहे. सरकार कोण चालवतय ते कळत नाही, ड्रायव्हरच नाही.

याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात तीव्र पडसाद उमटतांना दिसत आहेत. नारायण राणे यांनी केलेल्या वक्तव्याबाबत क्रांती चौक पोलीस ठाण्यात तक्रार देखील दाखल केली आहे. संतप्त शिवसैनिकांसह क्रांती चौकात राणेंच्या फोटोला जोडे मरो आंदोलन करण्यात आले. ‘कोंबडीचोर’ या उपाधीला साजेशा कोंबड्या देखील या आंदोलनात आणल्या गेल्या होत्या. कोंबड्या सोडून, कोंबडीचोराने आता एवढेच काम करावे. असा टोला अंबादास दानवे यांनी यावेळी लगावला.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!