Share

नारायण राणेंच्या घराबाहेर शिवसेना-भाजप कार्यकर्त्यांचा तुफान राडा, पोलिसांचा लाठीचार्ज; पाहा हा व्हिडिओ

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : स्वातंत्र्य दिनाच्या भाषणावरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका करताना नारायण राणेंनी मी असतो तर कानाखाली लगावली असती असं वक्तव्य केल्याचं पहायला मिळालं. या वक्तव्यानंतर मध्यरात्रीपासून महाराष्ट्रात शिवसेनेकडून विविध ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे. दरम्यान, नारायण राणे यांचे निवासस्थान असलेल्या जुहू येथील बंगल्यावर युवासेनेतर्फे जोरदार आंदोलन करण्यात येत आहे. जुहू इथल्या नारायण राणे यांच्या घराबाहेर राणे समर्थक आणि शिवसैनिक आमनेसामने आलेल्या मोठा गोंधळ उडाला आहे.

आक्रमक झालेल्या शिवसैनिकांनी नारायण राणेंच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी सुद्धा जोरदार घोषणा देण्यास सुरुवात केली. त्याच दरम्यान शिवसेना-भाजपचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. सकाळपासूनच या परिसरात मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मात्र, कार्यक्रते इतके आक्रमक होते की जोरदार राडा झाला. यावेळी पोलिसांनी कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी सौम्य लाठीचार्ज केला.

वरुण सरदेसाई यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात येत आहे. यावेळी नारायण राणे यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. मुंबईत युवासेना आणि भाजपा कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. यानंतर पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी लाठीजार्ज केला.

मुंबईत युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी राणेंविरोधात आक्रमक घोषणाबाजी करण्यात येत आहे. संतप्त शिवसैनिकांनी नारायण राणे छक्का है, नारायण राणे भडवा है अशा तीव्र घोषणा देत आहेत. तसेच नारायण राणेंवर खालच्या पातळीवर जाऊन टीका सुरूये. राणेंनी उद्धव ठाकरेंबाबत वादग्रस्त वक्तव्य करून मोठं संकट ओढावून घेतल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!