🕒 1 min read
मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त विधानामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. राणेंच्या या वक्तव्याने शिवसैनिक संतापले असून राज्यात विविध ठिकाणी निदर्शने करत आहेत.
मुंबईत युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी राणेंविरोधात आक्रमक घोषणाबाजी करण्यात येत आहे. संतप्त शिवसैनिकांनी नारायण राणे छक्का है, नारायण राणे भडवा है अशा तीव्र घोषणा देत आहेत. तसेच नारायण राणेंवर खालच्या पातळीवर जाऊन टीका सुरूये. राणेंनी उद्धव ठाकरेंबाबत वादग्रस्त वक्तव्य करून मोठं संकट ओढावून घेतल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
नारायण राणे यांच्या विधानावरुन शिवसैनिकांमध्ये चांगलाच रोष दिसून येत आहे. राणे यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांबद्दल असे विधान करायला नको होते. पोलिसांचा कोणताही बंदोबस्त नसल्याने चारचाकी कार्यालयातून आलेल्या युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक करत काचा फोडल्या आणि तेथून निघून गेले. आमच्या कुटुंबप्रमुखाचा अपमान झाला असल्याचं म्हणत त्यांनी मुख्यमंत्र्यांसह संपूर्ण महाराष्ट्राची माफी मागावी, अशी मागणी त्यांनी केली.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. मुख्यमंत्र्यावर केलेल्या वक्तव्याप्रकरणी नारायण राणेंना अटक करण्याचे आदेश नाशिक पोलिसांकडून देण्यात आले आहेत. आजच नारायण राणे यांना अटक करुन कोर्टासमोर हजर केलं जाऊ शकतं. दरम्यान, जनआशीर्वाद यात्रेदरम्यान बोलताना नारायण राणे याची जीभ घसरली होती. यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख करत त्यांना कानशिलात लगावण्याचं वक्तव्य केलं होतं.
काय म्हणाले होते नारायण राणे?
स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात संबोधित करत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे स्वातंत्र्याचा महोत्सवी वर्ष असल्याचं विसरले. त्यांनी हिरक महोत्सव म्हटलं. त्या ठिकाणी उपस्थित असलेले राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी अमृत महोत्सव असल्याचं मुख्यमंत्र्यांना सांगितलं. मग मुख्यमंत्र्यांनी आपली चूक सुधारली. यावर जन आशीर्वाद यात्रेदरम्यान महाड येथे नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत टीका करताना आक्षेपार्ह वक्तव्य केले . मला मुख्यमंत्र्यांची लाज वाटते. मुख्यमंत्र्यांना देशाला स्वातंत्र कुठल्या वर्षी मिळाले ते वर्ष सुद्धा माहिती नाही. स्वातंत्रदिनाच्या भाषणात हे दिसले. मी तेथे असतो तर एक थप्पड लगावली असती, असे वादग्रस्त विधान राणे यांनी केले होते.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘मी काय नॉर्मल माणूस वाटलो काय तुम्हाला’, राणेंची पहिली प्रतिक्रिया
- मुख्यमंत्र्यांचा अपमान हा त्यांचा नाही तर महाराष्ट्राचा अपमान आहे – राष्ट्रवादी
- राणेंच्या वक्तव्यानंतर शिवसेना-भाजप मध्ये वाद पेटला, नाशिकच्या भाजपा कार्यालयाची तोडफोड
- ‘खऱ्या आईचं दूध पिलं असेल तर समोर या, तुमची औकात दाखवून देऊ’, निलेश राणेंचा इशारा
- पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेला तात्पुरती स्थगिती
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
