Share

मनोज ठवकर प्रकरणाशी संबंधित पोलिसांचे निलंबन करा; फडणवीसांची मागणी

Published On: 

नागपूर – पोलिसांच्या मारहाणीत मृत्यूमुखी पडलेल्या मनोज ठवकर यांच्या कुटुंबीयांची विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेत त्यांचे सांत्वन केले. यावेळी त्यांनी ठवकर कुटुंबीयांना भाजपकडून दोन लाखांची आर्थिक मदतही देण्याचे जाहीर करत  ठवकर कुटुंबाला धीर देखील दिला.

मनोज ठवकर हे गुन्हेगार नव्हते, ते कोठडीत नव्हते. मास्क लावला नाही हा काही मोठा गुन्हा ठरत नाही. तो केवळ दंड ठोठावण्याचा गुन्हा आहे. या गुन्ह्यात कोणाला अटक करता येत नाही. तसेच शिक्षाही करता येत नाही. मनोज यांना पकडून पोलिसांनी मारहाण केल्याने त्यांचा मृत्यू झाला असून एक प्रकारे ही हत्याच असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला आहे.

हे लक्षात घेता संबंधित पोलिसांना निलंबित करा, केवळ त्यांची बदली करून त्यांना पाठिशी घालू नका, असेही फडणवीस म्हणाले. मनोज ठवकर प्रकरणाचा तपास सीआयडीकडे देण्यात आला ही चांगली गोष्ट झाल्याचे फडणवीस म्हणाले. मात्र, सीआयडीचा तपास होईपर्यंत या संबंधित पोलिसांना निलंबित केले पाहिजे, अशी मागणी फडणवीस यांनी केली. हेल्मेट घातले नाही म्हणून दंड आकारला गेला पाहिजे, या गुन्ह्यासाठी कुणाच्या अंगावर लाठ्या तोडण्याचा अधिकार पोलिसांना नसल्यातेही ते म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!