अहमदाबाद : इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील निर्णायक सामन्यात भारताने विजय मिळवत आपले मालिकेतील आव्हान कायम ठेवले. या सामन्यात सुर्यकुमार यादवने धडाकेबाज फंलजाजी करत सर्वांची मने जिंकली. या सामन्यात त्याने षटकार मारत आपल्या अंतरराष्ट्रीय कारकिर्दीची सुरुवात केली. याचा परिणाम म्हणून इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय संघात सुर्यकुमार यादवचा समावेश करण्यात आला आहे.
आपल्या कारकिर्दीच्या दुसऱ्याच सामन्यात सुर्यकुमारने चौथ्या टी-२० सामन्यात आपल्या फलदांजीचे सुरेख दर्शन दाखवत अर्धशतक झळकावले. पहिल्या अंतरराष्ट्रीय सामन्यात सुर्यकुमार यादवला फलंदाजी करण्याची संधी मिळाली नव्हती. मात्र चौथ्या सामन्यात संधी मिळताच सुर्यकुमार यादवने षटकार मारत आपल्या अंतरराष्ट्रीय कारकिर्दीची सुरुवात केली. जगविख्यात गोलंदाज जोफ्रा आर्चरच्या गोलंदाजीवर सुर्यकुमारने षटकार लगावला. या सामन्यात ३ षटकार आणि ६ चौकारासह त्याने ३१ चेंडूत ५७ धावा केल्या होत्या.
या धमाकेदार खेळीसाठी त्याला सामनावीराचा पुरस्कार मिळाला होता. या सामन्यात भारताने इंग्लंडच्या संघावर ८ धावांनी विजय मिळवला होता. इतकच नव्हे तर या सामन्यानंतर इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतील सामन्यासाठी निवडलेल्या भारतीय संघात त्याचा समावेश करण्यात आला.
महत्वाच्या बातम्या
- पाचव्या आणि अंतिम सामन्यात भारतीय संघात ‘या’ बदलांची शक्यता
- पराभवानंतर इंग्लंडच्या कर्णधाराने मान्य केली चुक, आयसीसीनेही केली कारवाई
- सलमान खानच्या चाहत्यासाठी महत्वाची बातमी
- नागपुरात कोरोनाचा कहर, पालकमंत्र्यांनी बोलावली बैठक !
- माहिती अधिकाराचे उल्लंघन करणे पडले महागात, ८५ हजारांचा दंड
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

