नांदेड : जिल्ह्यात माहिती अधिकाराचे उल्लंघन केल्याप्रकरणी मोठी कारवाई करण्यात आली आहे. मुखेड तालुक्यातील वेगवेगळया १७ प्रकरणात विहित मुदतीत संबंधितांनी माहिती दिली नाही. त्यामुळे संबंधीतांना १७ प्रकरणात प्रत्येकी पाच हजार रुपये प्रमाणे ८५ हजार रुपयाच्या दंड राज्य माहिती आयोगाच्या औरंगाबाद खंडपीठाने ठोठावला आहे. त्यामुळे वेळेत माहिती न देणाऱ्या मंडळींना आता तरी जाग येईल अशी अपेक्षा केली जात आहे.
माजी जि. प. सदस्य बालाजी बंडे यांनी माहिती अधिकार अधिनियम २००५ चे कलम ६ (१) अन्वये संबंधीताकडे माहिती मागीतली पण मुदतीत माहिती न दिल्याने माहिती अधिकार अधिनियम २००५ चे कलम १९ (१) अन्वये प्रथम अपिल अपिलीय अधिकारी यांच्याकडे अपील दाखल केले. अपिलामध्ये माहिती देण्याचे आदेश होवुनही माहिती न दिल्याने, माहिती अधिकार अधिनियम २००५ चे १९ (३) अन्वये राज्य माहीती आयोग खंडपीठ औरंगाबाद यांच्याकडे द्वितीय अपिल दाखल केले यावर खंडपीठामध्ये सुनावणी होऊन खंडपीठाने विहित मुदतीत माहिती देण्याचे व माहिती अधिकार अधिनियम २००५ चे कलम ७ (१) चा भंग झाल्याने, याबाबतचा खुलासा ३० दिवसात आयोगाकडे सादर करण्याचा आदेश दिला होता.या आदेशाच्या प्रती सर्व संबंधीतांना दिल्या होत्या.
या ठोठावण्यात आलेल्या दंडामुळे येणाऱ्या काळात माहिती देण्यात विलंब करणाऱ्याना मोठा फटका बसणार आहे. या पुढे लवकर माहिती देण्यात विलंब केल्यास आपल्याला वर ही कारवाई होऊ शकते या भीतीने तरी या पुढे लवकर माहिती मिळेल अशी अपेक्षा करण्यात येत आहे.
महत्वाच्या बातम्या
- बायोवेस्ट फेकणाऱ्याविरूध्द गुन्हा दाखल, वडगाव कोल्हाटी येथील घटना
- माझ्या राजीनाम्याच्या बातम्यांमध्ये अजिबात तथ्य नाही – अनिल देशमुख
- ठाकरे सरकारनं कुणालाही नकोसा वाटेल असा पहिला नंबर पटकावला’
- यावेळचे कोरोना व्यवस्थापन अधिक आव्हानात्मक – उद्धव ठाकरे
- माजी आमदार मेधा कुलकर्णी यांच्याविरोधात मारहाणीची तक्रार दाखल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

