Share

नागपुरात कोरोनाचा कहर, पालकमंत्र्यांनी बोलावली बैठक !

Published On: 

नागपूर : कोरोनाचा धोका पुन्हा एकदा वाढत चाललेला आहे. कोरोनाचा रुग्णांचा वाढता आकडा लक्षात घेता चिंता व्यक्त केली जात आहे. सरकारकडून देखील राज्यातील काही भागामध्ये कडक निर्बंध लावण्यात आले आहे. तरी देखील अनेक नागरिक कोरोनाच्या नियमनाचे पालन करताना दिसत नाही. लोकांना गांभीर्य नसल्याचे वाढत्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.

नागपुरात शहरामध्ये वेगाने वाढणाऱ्या कोरोना प्रादुर्भावच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री नितीन राऊत यांनी आढावा बैठक बोलावली आहे. नागपुरात 21 मार्चपर्यंत लॉकडाऊन आहे. मात्र आता ते वाढणार का? याकडे सगळ्यांच लक्ष लागलं आहे. विभागीय आयुक्त कार्यालयात ही बैठक होत आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह शहरातील आमदार बैठकीला उपस्थित आहे.

‘शहरात मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्णसंख्या वाढत असून गेल्या दोन तीन दिवसात मृत्यूची संख्या देखील वाढत आहे. या अनुषंगाने नागपुरात आज पालकमंत्र्यांनी बैठक बोलावली आहे. आम्ही या बैठकीला आलो आहोत. तात्काळ काय उपाययोजना करता येईल या अनुषंगाने या बैठकीत चर्चा केली जाणार आहे’, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.

‘विशेषतः रुग्णसंख्या वाढत असताना ज्यांना रुग्णालयाची गरज आहे. त्यांना बेड्स उपलब्ध झाले पाहिजे रुग्णालयाच्या बिलाचा प्रश्न पुन्हा एकदा पुढं आलात, यावर तोडगा या बैठकीत काढला जाईल, जे काही जनतेसाठी करता येईल ते करू. लॉकडाउन हा पर्याय नाही, मात्र सात दिवस लॉकडाउन केले आहे, प्रशासनाला वाटत असेल लॉकडाउन लावले पाहिजे तर आम्ही टोकाची भूमिका घेणार नाही असे देखील’, फडणवीस यावेळी म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!