अहमदाबाद : इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या टी-२० सामन्यात आखेरच्या षटंकात इंग्लंडच्या संघाचा पराभव झाला. मात्र याच सामन्यात इंग्लंडच्या संघाकडून आणखी एक चुक झाली आणि त्याची शिक्षा आयसीसीने इंग्लंडच्या संघाला दिली आहे. निर्धारित वेळेत २० षटके पुर्ण न केल्यामुळे आयसीसीने इंग्लंडच्या संघावर कारवाई केली आहे.
गुरुवारी झालेल्या चौथ्या टी-२० सामन्यात भारताने इंग्लंडच्या संघावर आखरेच्या षटकात ८ धावांनी विजय मिळवला. या विजयाने भारताने मालिकेतील आपले आव्हान कायम ठेवत २-२ अशी बरोबरी साधली होती. या सामन्यात भारताने इंग्लंडच्या संघासमोर १८६ धावांचे लक्ष्य होते. धावांचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ १७७ धावापर्यंतच मजल मारू शकला.
मात्र या सामन्यातील पहिल्या डावात इंग्लंडच्या सघांने निर्धारीत वेळेत २० षटके पुर्ण केली नसल्यामुळे आयसीसीने त्यांच्यावर कारवाई केली. या कारवाईत इंग्लंडच्या संघाने संथगतीने गोलंदाजी केल्यामुळे त्यांच्या मानधनाच्या २० टक्के रक्कम कमी करण्यात आली आहे. आयसीसीने या चुकीबाबत इंग्लंडचा कर्णधार इयान मॉर्गनला प्रश्न केले होते. यावेळी मॉर्गनने आपली चुक मान्य केली.
महत्वाच्या बातम्या
- सलमान खानच्या चाहत्यासाठी महत्वाची बातमी
- नागपुरात कोरोनाचा कहर, पालकमंत्र्यांनी बोलावली बैठक !
- माहिती अधिकाराचे उल्लंघन करणे पडले महागात, ८५ हजारांचा दंड
- ढगाळ वातावरणामुळे बळीराजा चिंतेत
- हर्ट अटॅकनंतर पहिल्यांदाच टीव्ही शो मध्ये सहभागी झालेला रेमो डिसूजा झाला भावुक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

