Share

सलमान खानच्या चाहत्यासाठी महत्वाची बातमी

Published On: 

मुंबई : बॉलीवूडचा सुपरस्टार सलमान खानने याच आठवड्याच ट्विट करुन त्याचा आगामी बहुप्रतिक्षीत ‘राधे’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहिर केली. सलमानचा ‘राधे’ हा चित्रपट १३ मे म्हणजे ईदच्या दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. हा चित्रपट सिनेमागृहातच प्रदर्शित होईल असे सलमान आणि चित्रपटाच्या निर्मात्यांनी ठासुन सांगितले होते. मात्र राज्यात आणि देशात कोरोना व्हायरसचा धोका पुन्हा नव्याने वाढू लागल्याने हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित करण्याचा विचार सुरु आहे.

सलमान खानचा ‘राधे’ हा चित्रपट मागील वर्षी ईदला येणार होता. मात्र कोरोना संसर्गामुळे दहा महिन्यापेक्षा अधिक वेळ देशातील चित्रपटगृहे बंद होती. मात्र आता हळुहळु सर्वकाही पुर्वपदावर येत आहे. यादरम्यान बॉलीवूडच्या अनेक रखडलेल्या चित्रपटाचे चित्रीकरण पुर्ण होऊन तेही प्रदर्शनासाठी सज्ज झाले. मात्र कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता सिनेमागृहात किती प्रेक्षक सिनेमा बघायला येतील याबाबत निर्माते साशंक आहेत.

चित्रपटगृहे सुरु होऊन प्रेक्षकांची संख्या अजूनही रोडावलेली आहे. कारण कोरोनाची भिती गेलेली नाही. त्यामुळे चित्रपटगृहात चित्रपट प्रदर्शित करुन नुकसान सहन करावे लागण्यची शक्यता आहे. त्यामुळे ‘राधे’ हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्याचा निर्णय होऊ शकतो. सलमानचा ‘राधे’ चित्रपटाच्या काळात आयपीएल सुरु असल्याने त्याचाही परिणाम चित्रपटगृहातील प्रेक्षकांच्या संख्येवर होऊ शकतो असे निर्मात्यांचे म्हणणे आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!