Share

पाचव्या आणि अंतिम सामन्यात भारतीय संघात ‘या’ बदलांची शक्यता

Published On: 

अहमदाबाद : इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या आणि निर्णायक सामन्यात भारतीय संघाने विजय मिळवत मालिकेतील आपले आव्हान कायम ठेवले आहे. शनिवारी या मालिकेतील निर्णायक आणि अंतिम सामना होणार आहे. या सामन्यातील विजयी संघाच्या खिशात मालिका जाणार आहे. मात्र या सामन्याआधी भारतीय संघात मोठा बदल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत सपशेल अपयशी झालेला भारताचा सलामीवीर लोकेश राहुलला संघाबाहेर केले जाऊ शकते. आतापर्यंत झालेल्या चारही सामन्यात राहुलला संधी मिळाली आहे. मात्र या चारही सामन्यात राहुल चांगली कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळे त्याला संघाबाहेर बसवले जाऊ शकते. राहुल संघाबाहेर झाला तर भारतासमोर पहिला पर्याय असेल तो इशान किशनचा आणि दुसरा पर्याय आहे तो शिखर धवनचा. इशान किशनने पदार्पनाच्या सामन्यात सलामीला येत शानदार अर्धशतक करत भारताला विजयी करण्यात मोलाचा वाटा उचलला होता. तर शिखर धवनला केवळ एकाच सामन्यात संधी देण्यात आली होती.

यादरम्यान चौथ्या सामन्यात अर्धशतकी खेळी करणाऱ्या सुर्यकुमारला संघात कायम ठेवले जाईल. इतर फलंदाजात कोणताही बदल होण्याची शक्यता कमी आहे. मात्र गोलंदाजाची कामगीरी पाहता अंतिम सामन्यात भारतीय संघ हा एका फिरकीपटूसोबत मैदानात उतरण्याची शक्यता आहे. कारण फिरकी गोलंदाजानी दिलेल्या धावांचे प्रमाण हे जलदगती गोलंदाजापेक्षा जास्तच आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!