Share

सुर्या, पृथ्वीच्या इंग्लंड दौऱ्यातील निवडीमुळे लंकेविरुद्ध ‘हे’ खेळाडू करु शकतात पदार्पण

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : इंग्लंड दौऱ्यावरील भारतीय संघाचे खेळाडू शुभमन गील, आवेश खान आणि वॉशिग्टन सुंदर जखमी झाल्याने आगामी कसोटी मालिकेतून बाहेर पडले. त्याच्याजागी बदली खेळाडू म्हणून बीसीसीआय निवड समीतीने पृथ्वी शॉ आणि सुर्यकुमार यादव या दोघाची निवड केली.

श्रीलंका दौऱ्यात भारतीय संघात आतापर्यंत तब्बल ९ खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. मात्र अद्यापही देवदत्त पडिक्कल आणि ऋतुराज गायकवाड हे संधीच्या प्रतिक्षेत आहे. मात्र आता पृथ्वी शॉ आणि सुर्यकुमार यादव या दोन खेळाडूंनी इंग्लंड दौऱ्यासाठी निवड झाल्याने श्रीलंकेविरुद्ध आगामी सामन्यात त्यांना आराम दिला जाऊ शकतो. जर असे घडले तर देवदत्त पडिक्कल आणि ऋतुराज गायकवाड या दोघांना आंतरराष्ट्रीय पदार्पणाची संधी मिळू शकते.

एकदिवसीय मालिकेत भारताने चेतन सकारिया, कृष्णप्पा गौतम, नितीश राणा, सुर्यकुमार यादव, इशान किशन, राहुल चहर, संजु सॅमसन या खेळाडूंना पदार्पणाची संधी दिली. तर पहिल्या टी-२० सामन्यात पृथ्वी शॉ आणि वरुण चक्रवर्ती या दोन खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. देवदत्त पडिक्कलने यावर्षी झालेल्या आयपीएल स्पर्धेत सलामीला खेळताना शतक झळकावले होते. तर ऋतुराजने सीएसकेकडून सलामीला खेळताना सातत्याने चांगली कामगिरी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!