पारनेर : कोविड केअर सेंटरमध्ये आगळेवेगळे उपक्रम राबवून स्वत:ला रुग्णसेवेत गुंतवून घेतलेले पारनेरचे राष्ट्रवादीचे आमदार नीलेश लंके सध्या चांगलेच चर्चेत आहेत. मात्र, सोशल मीडियातून बदनामी केल्याचा आरोप करून लंके यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्याला एक कोटी रूपयांच्या नुकसान भरपाईची नोटीस पाठविली आहे.
अविनाश पवार असं या मनसे पदाधिकाऱ्याचं नाव आहे, ते पारनेर मनसेचे तालुका उपाध्यक्ष आहेत. आमदार लंके यांनी वकिलामार्फत पाठवलेल्या या नोटीसमध्ये अविनाश पवार यांच्याकडे बदनामी पोटी 1 कोटी रुपये आणि नोटीस खर्च 5 हजार असे एकूण 1 कोटी 5 हजार रुपये देऊन माफी मागण्याची मागणी केली आहे. निलेश लंके यांचे वकील राहुल झावरे म्हणाले, ‘पारनेरचे लोकप्रतिनिधी निलेश लंके मनसेचे पदाधिकारी अविनाश पवार यांनी बनावट ऑडिओ तयार करुन फेसबूक, व्हॉट्सअॅप आणि इंस्टाग्रामवर बदनामी केली आहे.
त्यामुळे त्यांना कायदेशीर 1 कोटीची अब्रुनुकसानीची नोटीस दिली आहे. आमदार निलेश लंके यांचं काम जगभर पोहचलं आहे. शरदचंद्र पवार आरोग्य मंदिराच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक कार्याचं चांगलं उदाहरण त्यांनी उभं केलंय. अशा माणसाची बदनामी केली जात असेल तर त्याला कायदेशीर नोटीस देणं आवश्यक आहे.’
आमदार निलेश लंके यांनी मनसे पदाधिकारी अविनाश पवार यांना दिलेल्या नोटीसमध्ये 1 कोटी 5 हजार रुपये देऊन लेखी माफी मागण्यासाठी 15 दिवसांचा कालावधी दिलाय. या 15 दिवसात त्यांनी तसं न केल्यास त्यांच्याविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करु, असा इशारा दिला आहे.
महत्वाच्या बातम्या
- अनिल परब फक्त दोन महिन्यांचे पाहुणे; किरीट सोमय्यांचे भाकीत
- कोरोनाचा उगम चीनच्याच प्रयोगशाळेत; समोर आला ‘हा’ पुरावा
- मोदींनी गेल्या सात वर्षात जनतेचा विश्वास गमावला ; शिवसेना खासदाराची टीका
- ‘मोदी सरकारच्या काळात दक्षिण भारतीय चित्रसृष्टी आणि हॉलीवूडलाही लाजवेल, असे स्टंट पाहायला मिळाले’
- मराठा आरक्षण : पायात पाय घालण्यापेक्षा हातात हात घालून काम करू – अशोक चव्हाण
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
