Share

…आणि म्हणून माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी घेतला राजकारणातून संन्यास

Published On: 

सिंधदुर्ग: माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू (Suresh Prabhu) यांनी निवडणुकीच्या राजकारणातून संन्यास घेतला आहे. यापुढे निवडणूक लढवणार नाही, अशी घोषणा प्रभू यांनी कणकवलीमध्ये झालेल्या व्यापारी महासंघाच्या मेळाव्यात केली. अटलबिहारी वाजपेयी आणि मोदी सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रिपद भूषवलेले सुरेश प्रभू सध्या राजकारणापासून दूर असल्याचं दिसत होतं. यावर त्यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

कणकवलीमध्ये झालेल्या व्यापारी महासंघाच्या मेळाव्यात बोलताना सुरेश प्रभू म्हणाले, मी २०१४ मध्ये लोकसभा निवडणुक लढविली नव्हती, तशीच यापुढेही निवडणूक लढविणार नाही. मात्र प्रत्येक माणसाशी संबधित असलेल्या पर्यावरणाचा प्रश्न सोडविण्यासाठी प्राधान्य देणार असल्याची ग्वाही माजी केंद्रीय मंत्री खासदार सुरेश प्रभू यांनी दिली आहे.

राजकारणातून संन्यास घेतल्यानंतर पर्यावरणासाठी काम करणार असल्याचे सुरेश प्रभू यांनी सांगितले आहे. याबद्दल बोलताना प्रभू म्हणाले, हवामानात बदल होत असल्यानं वादळांची संख्या वाढतेय. अवकाळी पाऊस वर्षभर कोसळण्याची शक्यता निर्माण झाली. त्यामुळे पर्यावरणाचे प्रश्न सोडविण्याला प्राधान्य देणार आहे. राजकारण विरहीत प्रश्न सोडवायचे आहेत, त्यामुळेच निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला असल्याचे प्रभूंनी स्पष्ट केले.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!