Share

शिवसेना निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ‘जुमले का अर्थसंकल्प’ सादर करत नाही- किशोरी पेडणेकर

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: शिवसेनेची सत्ता असलेल्या मुंबई महापालिकेचा २०२२ – २३ वर्षाचा अर्थसंकल्प गुरुवारी ३ फेब्रुवारी) सादर होणार आहे.
आगामी निवडणुका आणि कोरोना संकट कायम असताना स्थायी समितीला सादर केल्या जाणाऱ्या या बजेटबाबत सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. तत्पूर्वी यावरच मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Mumbai Mayor Kishori Pednekar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

“उद्या BMC चा अर्थसंकल्प सादर (Mumbai Municipal Corporation Budget) होणार आहे. शिवसेना निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ‘जुमले का अर्थसंकल्प’ सादर करत नाही, तर आम्ही लोकाभिमुख अर्थसंकल्प सादर करतो. आगामी बीएमसी निवडणुकीसाठी शिवसेना पूर्णपणे सज्ज असून यावेळीही विजयी होईल”, अशी आशा महापौर किशोरी पेडणेकर यांनी व्यक्त केली आहे.

तसेच ‘जुमले का अर्थसंकल्प’ म्हणत त्यांनी अप्रत्यक्ष विरोधी पक्षाला चांगलाच टोलाही लगावला आहे. कालच (१ फेब्रुवारी)केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी २०२२-२३ चा केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. यावर महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांनी महाराष्ट्राला काहीही मिळाले नसल्याची टीका केली आहे. तर आत किशोरी पेडणेकर यांनी ‘जुमले का अर्थसंकल्प’ म्हणत अप्रत्यक्ष विरोधी पक्षावर निशाणा साधला आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!