भारतीय संघाचा धडाकेबाज फलंदाज सूर्यकुमार यादव याने एक नवीन कार खरेदी केली आहे. भारतीय एकदिवसीय संघाचा आणि मुंबई इंडियन्सचा धडाकेबाज फलंदाज सूर्यकुमार यादव याने ‘निसान जोंगा’ ही नवीन चारचाकी घेतली आहे. त्याने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर त्या कारसोबतचे फोटोही शेअर केले आहेत. सूर्यकुमार यादव याने घेतलेली निसान जोंगा ही चारचाकी एसयूव्ही प्रकारातली असून भारतात या चारचाकी गाडीची किंमत १० लाख पासून पुढे सुरु होते.
इंस्टाग्रामद्वारे सूर्यकुमार यादवने ही नवीन चारचाकी विकत घेतल्याची माहिती चाहत्यांना दिली आहे. इन्स्ट्राग्रामवर आपल्या नवीन गाडीचा फोटो टाकत त्याने खाली ” माझ्या कुटुंबातील भल्यामोठ्या नव्या खेळण्याला सगळ्यांनी hello म्हणा” असे कॅप्शन दिले आहे. सूर्यकुमार यादवने विकत घेतलेल्या या नवीन चारचाकीचे भारतीय आर्मीशी आणि भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी यांच्याशी वेगळं नात आहे. भारतीय लष्कर विशेष मोहिमांसाठी निसान जोंगा ही चारचाकी वापरत असत. भारतीय लष्करातर्फे मोठ्या प्रमाणात या चारचाकी गाडीचा वापर करण्यात आला आहे.
काही वर्षांपूर्वी ही चारचाकी गाडी सामान्य माणसांसाठी वापरायाला उपलब्ध नव्हती . मात्र सामान्य लोकांसाठी ही गाडी जेव्हा उपलब्ध करून देण्यात आली तेव्हा महेंद्र सिंह धोनी याने ही चारचाकी गाडी विकत घेतली होती. महेंद्र सिंह धोनीकडे गडद हिरव्या रंगाची निसान जोंगा आहे, तर सूर्यकुमार यादवने पोपटी रंगाची निसान जोंगा एसयूव्ही विकत घेतली आहे.
महत्वाच्या बातम्या :
- MHD Explains: शेतकरी आंदोलनाचा केंद्र सरकारने २०२२ च्या अर्थसंकल्पात बदला घेतला का?
- सरकारी संस्था तोट्यात असतांना सर्वसामान्य युवकांना नोकर्या देणार कशा? अर्थमंत्र्यांनी उत्तर द्यावे-सतीश चव्हाण
- “केंद्राचे अपयश झाकण्यासाठी भागवत कराड अजित दादांवर टीका करत आहेत”, रुपाली पाटलांची टीका
- “त्या तिघांकडून मी नेतृत्व कसे करायचे हे शिकलो” हार्दिक पंड्याची कर्णधारपदावर प्रतिक्रिया
- ‘रुको जरा सबर करो…’, म्हणणाऱ्या हिंदुस्थानी भाऊच्या अडचणीत वाढ; नागपूर पोलीस करणार अटक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

