Share

‘घेराईयां’ मधील ‘इंटिमेट सीनवर’ अनन्याच्या कुटूंबियांची अशी होती प्रतिक्रिया, जाणून घ्या

Published On: 

मुंबई : बॉलीवूड (Bollywood) अभिनेत्री अनन्या पांडे (actress Ananya Pandey) तिच्या चित्रपट तसेच वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. सध्या तिच्या ‘घेराईयां’ (film ‘Ghehraiyaan’) या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाचे प्रमोशन करत असून तिने अनेक बोल्ड सीन्स केले आहेत. यामुळे तिच्या इंटिमेट सीनवर तिच्या घरच्यांची प्रतिक्रिया काय असेल, यावर तिने खुलासा केला आहे.

दरम्यान अन्यन्या तिच्या नव्या लूकमुळे सोशल मीडियावर चर्चेत आहे. तसेच तिच्या आगामी चित्रपटानिमित्त एका मुलाखतीत अनन्याने या चित्रपटाविषयी सांगितले की, तिची आई प्रत्येक चित्रपटाची स्क्रिप्ट वाचते. जेव्हा अनन्याला काही करायचे असते तेव्हा तिचे वडील अभिनेता चंकी पांडे (father Chunky Pandey) फारसं हस्तक्षेप करत नाहीत. त्यांना माझे काम बघायचं असतं. मात्र तसेच तिचे आई-वडील सर्वात मोठे चीअरलीडर्स आहेत. त्यासोबतच ती त्यांच्यावर टीकाही केली आहे. अभिनेत्रीने सांगितले की तिच्या बहिणीला चित्रपटाचा ट्रेलर खूप आवडल्याने आनंद ही वाटत आहे.

शकुन बत्राच्या (Shakun Batra’s) ‘घेराईयां’ या चित्रपटात बरेच इंटिमेट सीन्स दाखवण्यात आले आहेत. यामुळे अनन्याने याचा उलगडा एका मुलाखतीत केला. तसेच हा चित्रपट ११ फेब्रुवारीला Amazon Prime Video वर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अनन्या पांडेसह दीपिका पदुकोण, सिद्धांत चतुर्वेदी यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. चित्रपटाचे सर्व कलाकार या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत.

या चित्रपटात एक गुंतागुंतीचे आधुनिक नाते आणि बेवफाई दाखवण्यात आली आहे. या चित्रपटातील ‘दुबे’ गाणे खूप पसंत केले जात आहे. या चित्रपटात दीपिका आणि सिद्धांतचे (Deepika Padukone, Siddhant Chaturvedi) इंटीमेट सीन्स पाहायला मिळणार आहेत. दीपिकाने यापूर्वीही असे सीन केले आहेत. मात्र अनन्या पांडेचा असा हा पहिलाच चित्रपट असून या चित्रपटाची उत्सुकता चाहत्यांना लागली आहे.

महत्वाच्या बातम्या:

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!