Share

‘युतीच्या चर्चेत पडू नका’; राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना आदेश

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: राज्यातील आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या (Municipal Corporation Election) पार्श्वभूमीवर मनसे नेत्यांची मुंबईत (MNS leaders meeting in Mumbai) एक बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी मनसेचे नेते, पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं. यावेळी कार्यकर्त्यांशी बोलताना स्वतंत्र लढण्याची तयारी ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

गेल्या अनेक दिवसांपासून भाजप आणि मनसेमध्ये युतीची चर्चा रंगत होती. मात्र अद्याप यावर कुठलाही निर्णय झाला नसल्याचे दिसत आहे. मनसेची बैठक पार पडल्यावर मनसे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी सांगितले की, निवडणुकीच्या दिवशी व्यवस्थापन कसं करायचं आहे या संदर्भातील कमिटी स्थापन करणार. उमेदवारांची नेमणूक कशी करणार या संदर्भातील चर्चा बैठकीत झाली. कमिटी स्थापन करून बैठका घेणार आहेत. गटअध्यक्ष यांच्या बैठक घेणार, १५ फेब्रुवारी पर्यंत अहवाल देणार आहोत.

या बैठकीमध्ये राज ठाकरे यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधतान अनेक गोष्टींवर चर्चा केली. यावेळी त्यांनी भाजप आणि मनसेच्या युती बाबत देखील स्पष्टीकरण दिले आहे. राज ठाकरे म्हणाले, युतीच्या चर्चेत पडू नका. तुम्ही निवडणुकीच्या कामाला लागा. तुमच्या मनात विचार येत असेल की युतीचे काय होणार, युती होईल की नाही ते पुढे बघू तुमची स्वतंत्र लढण्याची तयारी असली पाहिजे. महानगरपालिका निवडणुकांसाठी स्वतंत्र्य लढण्याच्या तयारीत रहा युतीच्या गोष्टीमध्ये अडकू नका.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!